Pune News : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. यातच उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज (ता. ५) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड ते पश्चिम बंगालमधील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे.
शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव चंद्रपूर येथे राज्याचे उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उन्हाचा चटका कायम असल्याने अकोला, सोलापूर येथे ४३ अंशांपेक्षा अधिक, तर चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, वाशीम, बीड, वर्धा येथे ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. आज (ता. ५) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.
शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ४०.१, धुळे ४१, जळगाव ४२.४, कोल्हापूर ३८.८, महाबळेश्वर ३३.९, मालेगाव ४३.८, नाशिक ३८.३, निफाड ३९, सांगली ४१, सातारा ४०.२, सोलापूर ४३.२, सांताक्रूझ ३३, डहाणू ३५.१, रत्नागिरी ३३,
छत्रपती संभाजीनगर ४०.४, बीड ४२.०, नांदेड ४२.६, अकोला ४३.४, अमरावती ४२.६, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४३.१, चंद्रपूर ४२.८, गडचिरोली ४२.८, गोंदिया ३९.४, नागपूर ४०.५, वर्धा ४२, वाशीम ४२.४, यवतमाळ ४१.
उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :
मालेगाव ४३.८, अकोला ४३.४, सोलापूर ४३.२, चंद्रपूर ४२.८, गडचिरोली ४२.८, जळगाव ४२.४, वाशीम ४२.४, बीड ४२, वर्धा ४२.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.