Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Forecast : राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम

Rain Alert : आज (ता. १२) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने तडाखा दिला आहे. पावसाळी वातावरणामुळे ‘ऑक्टोबर हीट’च्या चटक्यात होरपळणाऱ्या राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. आज (ता. १२) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान ३६ अंशांपार गेले. पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट झाली असून, बहुतांश ठिकाणी पारा पुन्हा ३५ अंशांच्या खाली घसरला आहे. शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमानात घट झाली आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. १२) मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.४, कोल्हापूर २७.७, महाबळेश्वर २२.५, मालेगाव ३२.४, नाशिक २९.३, निफाड ३१, सांगली २९, सातारा २९.२, सोलापूर ३३, सांताक्रूझ ३२.५, डहाणू ३२.१, रत्नागिरी ३१, छत्रपती संभाजीनगर ३२.४, बीड ३१.६, धाराशिव ३१.१, परभणी ३३.२, अकोला ३६, अमरावती ३४.२, भंडारा ३१, बुलडाणा ३३.७, चंद्रपूर ३३.२, गडचिरोली ३३.४, गोंदिया ३४.०, नागपूर ३३.७, वर्धा ३४, वाशीम ३३.६, यवतमाळ ३२.

शनिवारी (ता. १२) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शवणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :

विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : नंदूरबार, धुळे, सातारा, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT