Rain Alert Agrowon
हवामान

Vidarbha Rain Alert : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Monsoon Rain Forecast : राज्यातील पावसाचा जोर ओसरला असला, तरी ऊन-सावल्यांच्या खेळात श्रावण सरी हजेरी लावत आहेत.

अमोल कुटे

Pune News : राज्यातील पावसाचा जोर ओसरला असला, तरी ऊन-सावल्यांच्या खेळात श्रावण सरी हजेरी लावत आहेत. आज (ता. १) पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तसेच उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे.

नैर्ऋत्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगरपासून, रोहतक, बांदा, सिधी, रांची ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ९.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

गुरुवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. दिवसभर पाऊस थांबल्याने ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३० अंशांच्या खाली आहे. अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पावसाने उघडीप दिली असली तरी कोकण आणि घाटमाथ्यावर ऊन-सावल्यांचा खेळात हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. आज (ता. १) पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. ३१) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२६.५---२३.४

अहिल्यानगर---निरंक---२३.५

‎‎धुळे---२७.०---२०.०

जळगाव---निरंक---२३.२

जेऊर---२९.०---२०.५

‎‎कोल्हापूर---२६.१---२२.०

‎महाबळेश्‍वर---१९.३---१७.६

मालेगाव---२७.०---२२.०

‎‎नाशिक---२६.०---२२.२

‎निफाड---२७.३---२२.२

‎सांगली---२७.४---२२.२

‎सातारा---२५.६---२२.२

‎सोलापूर---२८.७---२३.८

‎सांताक्रूझ---२८.९---२६.०

डहाणू---२९.९---२४.७

‎रत्नागिरी---२९.४---२५.७

‎छत्रपती संभाजीनगर---२८.०---२२.७

‎धाराशिव---२७.६---२१.४

‎परभणी---२९.०---२३.५

परभणी (कृषी)---२८.५---२३.०

‎‎अकोला---३०.३---२४.६

अमरावती---२८.०---२३.०

भंडारा---२८.०---२३.०

बुलडाणा---२८.७---२२.४

‎ब्रह्मपुरी---२९.६---२४.४

‎चंद्रपूर---२८.४---२४.०

‎गडचिरोली---२७.४---२४.०

‎गोंदिया---२९.६---२४.४

‎नागपूर---२९.४---२३.४

‎वर्धा---२८.९---२४.२

‎वाशीम---२७.६---२१.८

‎यवतमाळ---२८.०---२३.०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’च्या बंदिस्त वाहिनीचे काम अपूर्ण

Poultry Farming: कोंबड्यांसाठी ‘स्टिंबायोटिक’ पूरक खाद्याची निर्मिती

Ranmewa Income: रानमेव्याच्या विक्रीतून घरखर्चाची बेगमी

Sugarcane Production: आडसाली, सुरू, खोडवा उसात सातत्यपूर्ण उल्लेखनीय उत्पादन

Bamboo Industry: बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना; विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT