Rain Update : नगरमध्ये मुर पाऊस, पिकांना दिलासा

Monsoon Rain News : गेल्या अनेक दिवसांपासून उसंत दिलेल्या पावसाने शुक्रवारी तसेच शनिवारी (ता. २७) रात्री अनेक भागांत हजेरी लावली. बहुतांश भागात मुर पाऊस झाला.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : गेल्या अनेक दिवसांपासून उसंत दिलेल्या पावसाने शुक्रवारी तसेच शनिवारी (ता. २७) रात्री अनेक भागांत हजेरी लावली. बहुतांश भागात मुर पाऊस झाला. कर्जत, जामखेड, शेवगावला बऱ्यापैकी पाऊस झाल्याची नोंद आहे.

या मुर पावसाने अडचणीत आलेल्या खरिपाच्या पिकाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अकोले तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा पाण्याची जोरदार आवक होत असून धरणातून विसर्ग वाढवला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाने मे महिन्यात जोरदार हजेरी लावली. नदी, नाले, गाव-पाझर तलाव भरले, नद्या वाहत्या झाल्या. शेतीची कामे वकर उरकून दरवर्षीच्या तुलनेत यंदा पंधरा ते वीस दिवस आधीच पेरण्याही झाल्या, मात्र गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पावसाने दडी मारली होती.

Rain
Palghar Heavy Rain: पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर

काही भागात अधून-मधून पडणारा रिमझिम पावसाचा अपवाद सोडला तर पाऊस गायब झाल्याने खरिपातील पीके अडचणीत आली. खास करून शेवगाव, पाथर्डी, कर्जत जामखेड आदी कोरडवाहु भागातील पिके सुकू लागली होती.

पाऊस नसल्याने खते देता आली नाही, त्यामुळे पिकांची वाढही खुंटल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. मात्र (शुक्रवारी) तसेच शनिवारी रात्री जिल्ह्यातील बहुतांश भागात अल्प प्रमाणात का होईना मुर पाऊस झाला. त्यामुळे खरिपाच्या पिकांना काहीसा का होईना दिलासा मिळाला आहे.

कर्जत, जामखेड, शेवगावला बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. अकोले तालुक्याच्या पश्‍चिम भागातील कळसूबाई, रतनवाडी, पांजरे, घाटघर, हरिचंद्रगड व अन्य भागात जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे धऱणात पाण्याची मोठी आवक होत आहे.

त्यामुळे भंडारदरा धरणातून ९३२९ क्युसेने तर निळवंडे धरणातून १२ हजार ७६२ क्युसेकने विसर्ग केला जात आहे. मुळा नदीतूनही मुळा धरणाकडे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे, शनिवारी रात्री कोतूळजवळ मुळा नदी २३ हजार क्युसेकने तर रविवारी सकाळी ९५४५ क्युसेकने मुळा नदीतून धरणाकडे पाणी येत होते.

Rain
Pune Heavy Rain: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

३१ जुलैअखेर मुळा धरणात २१ हजार ८०९ दशलक्ष घनफूट (८३.८८ टक्के) (पावणेबावीस टीएमसी) पाणी स्थिर ठेवून विसर्ग केला जाणार आहे. रविवारी (ता. २७) मुळा धरणात ७७.७९ टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे ३१ जुलैच्या आधीच धरणातून पुन्हा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

भंडारदरा धरणाचा ८६.४३ टक्के तर निळवंडे धरणाचा रविवारी सकाळी ८८.५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांमध्ये रतनवाडी येथे १७९ मिलिमीटर, घाटघर येथे १५५ मिलिमीटर भंडारदरा येथे ८५ मिलिमीटर पांजरे येथे ७८ मिलिमीटर व निळवंडे येथे ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com