Weather Update  Agrowon
हवामान

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढला; शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेण्याचा सल्ला

Weather Forecast: राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश भागात कमाल तापमान ३४ ते ३८ अंश सेल्सियसच्या दरम्यान आहे.

Dhananjay Sanap

Pune News: राज्यात पहाटेची थंडी कमी झाली आहे. तर दुपारी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश भागात कमाल तापमान ३४ ते ३८ अंश सेल्सियसच्या दरम्यान आहे.

मागील २४ तासात अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. विदर्भात पुढील पाच दिवस कमाल तापमानात कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान सरासरी आहे.

पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचं कमाल तापमान २ ते ३ अंश सेल्सियने वाढ होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पुढील ४ ते पाच दिवसानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात कमाल तापमानात ३ ते ४ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.

तर पुढील २४ तासात उत्तर महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी किमान तापमान १ ते २ अंशाने कमी होण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर किमान तापमान २ ते ३ अंशाने वादह शक्यता आहे. विदर्भात मात्र कमाल तापमान कायम राहणार असून पुढील ३ दिवसांनी तुरळक ठिकाणी किमान तापमानात घट येण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

राज्यात आकाश निरभ्र असून तापमानात वाढ होऊ लागली. दव आणि धुक्याचं प्रमाणही कमी होऊ लागलं आहे. वायव्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर मध्य पाकिस्तान ते गुजरातपर्यंत ईशान्य अरबी समुद्रावर  १.५ किलोमीटर ऊंचीवर कमी दाबाचा पट्टा आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात १ ते २ अंशाने घट होण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात मात्र कमाल आणि किमान तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

कोकणातील शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या पिकांची काढणी करावी. उन्हाळी भुईमुगाला आणि उन्हाळी भेंडीला पाणी द्यावं. तर उन्हाळी भाताच्या शेतात ३ ते ४ सेमी पाणी पातळी राखावी. कलिंगड फळाचं सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव करण्यासाठी भाताच्या पेंढयाने किंवा गवताने झाकून घ्यावं.

मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी सुरू ठेवावी. भुईमुग, बाजरी पिकांची पेरणी करावी. ऊसाची लागवड करावी. तर मराठवड्यातील हळद, जवस पिकांची काढणी करावी. उन्हाळी भुईमुग आणि तीळची पेरणी सुरू ठेवावी. तसेच विदर्भातील शेतकऱ्यांनी  हळद पिकांची काढणी करावी. धान रोपवाटीकेत रोपाचं वय २५ ते ३० दिवस झाल्यास रोवणी करावी, असा सल्ला कृषी हवामान केंद्राने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT