Modern Paddy Farming: कोकणातील पारंपरिक भातशेती आता आधुनिकतेची कास धरत असून मजुरांची कमतरता, वाढती मजुरी आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी यांत्रिक भात लागवडीकडे वळत आहेत. रोहा तालुक्यातील सांगडे येथे यांत्रिक पद्धतीच्या भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले, तर महाड तालुक्यात आतापर्यंत सुमारे १८ एकर क्षेत्रावर यंत्राद्वारे भात लागवड पूर्ण झाली असून या पद्धतीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे..सांगडे येथील कृषीनिष्ठ शेतकरी केशव खरिवले यांनी आपल्या शेतात यांत्रिक भात लागवडीचे प्रात्यक्षिक सादर केले. शेतीकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पाहिल्यास आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक उत्पादन आणि आर्थिक लाभ मिळू शकतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या शेताला कृषी अधिकारी व परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी भेट देत यंत्राद्वारे होणाऱ्या लागवडीची माहिती घेतली..Rice Transplantation: धानपट्ट्यात भात लागवडीच्या रोवणीला वेग.महाड तालुक्यातही आधुनिक शेतीला गती मिळत आहे. प्रभाकर भोईर, संदीप भोईर, लक्ष्मण शेलार, प्रशांत पालांडे, वैभव कदम, संतोष भोसले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी ही पद्धत स्वीकारली आहे. वलंग येथील गणेश कुर्डूनकर यांच्याकडे लागवड यंत्र भाड्याने उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि कमी वेळेत लागवड करता येत आहे. कामाचा वेग वाढला असून वेळ आणि मजुरीचा खर्च वाचत आहे..Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र.खर्चात बचतयंत्राद्वारे भात लागवडीसाठी रोपे प्लास्टिक ट्रेमध्ये तयार केली जातात. एका ट्रेमध्ये माती, शेणखत आणि सुमारे ७० ग्रॅम बियाण्यांचा वापर केला जातो. एका एकरासाठी केवळ ७ किलो बियाणे पुरेसे ठरते. पारंपरिक पद्धतीत याच क्षेत्रासाठी २० ते २५ किलो बियाणे लागते. त्यामुळे बियाण्याचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो..मजुरांची टंचाई दूर होणारपावसाळ्यात मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी ही भातशेतीसमोरील मोठी समस्या ठरत आहे. यांत्रिक लागवडीमुळे कमी मनुष्यबळात अधिक क्षेत्राची लागवड अल्पावधीत पूर्ण होते. वेळेवर लागवड झाल्याने उत्पादन वाढण्यास मदत होत असून शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास अधिक उत्सुक होत आहेत..महाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. यांत्रिक भात लागवड हा त्यातील प्रभावी प्रयोग असून अशा आधुनिक पद्धतीतून प्रगत शेती करणे काळाची गरज आहे.- किरण कोकरे, तालुका उपकृषी अधिकारी, महाड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.