Winter
Winteragrowon

Maharashtra's Rising Temperatures: तापमानात वाढ; उन्हाळ्याची चाहूल

February Weather Update: आज (ता. ५) उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात काहीशी घट होण्याचा, तसेच उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.
Published on

Pune News: राज्यात थंडी कमी झाली असतानाच, उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी पारा ३६ अंशांवर पोहोचला असून, विदर्भातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ५) उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात काहीशी घट होण्याचा, तसेच उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

वायव्य राजस्थान आणि परिसरावर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर गुजरातमध्ये देखील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १६० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. मंगळवारी (ता. ४) पंजाबच्या आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Winter
Maharashtra Weather: ऐन थंडीत उन्हाचा चटका; राज्यातील किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता

राज्यात कमाल तापमानाचा पारा सातत्याने वर जात आहे. मंगळवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला येथे ३७.१ अंश, तसेच वाशीम, वर्धा, अमरावती, बुलडाण्यासह मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, धुळे, जेऊर येथे तापमान ३६ अंशांवर पोहोचले आहे. अनेक ठिकाणी तापमान ३५ अंशांच्या पार असल्याने राज्यात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहे. उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहण्यास सुरुवात झाली आहे.

आकाश निरभ्र आकाश असून, धुके कमी होत किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमान १५ ते २२ अंशांच्या दरम्यान पोचले आहे. मंगळवारी (ता. ४) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ५) उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याचा, तर उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मंगळवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---कमाल---किमान

पुणे---३५.२---१४.८

अहिल्यानगर---३४.८---१३.५

धुळे---३६---१२.५

जळगाव---३४---१७.९

जेऊर---३६---१५

कोल्हापूर---३२.९---१८.८

महाबळेश्वर---२९.६---१६.८

Winter
Maharashtra Weather Update : ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता नाही

मालेगाव---३३.४---१६.८

नाशिक---३३.७---१४.६

निफाड---३१.६---११.९

सांगली---३४.४---१५.८

सातारा---३४.७---१५.५

सोलापूर---३६.३---१८.७

सांताक्रूझ---२९.८---१७.६

डहाणू---३०---१६.४

रत्नागिरी---३२.९---१९.१

छत्रपती संभाजीनगर---३४---१७.६

धाराशिव---निरंक---१६.४

परभणी---३५.२---१७.९

परभणी (कृषी)---३४.६---१४.२

अकोला---३७.१---१८.८

अमरावती---३६---१८

भंडारा---३५---१८

बुलडाणा---३६---२०.३

ब्रह्मपुरी---३७.८---१८.८

चंद्रपूर---३५.४---निरंक

गडचिरोली---३४---१८.४

गोंदिया---३४.७---२०

नागपूर---३५.६---१८.६

वर्धा---३६.५---२२

वाशीम---३६.८---२२

यवतमाळ---३४.६---२२

३६ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ३७.८, अकोला ३७.१, वाशीम ३६.८, वर्धा ३६.५, सोलापूर ३६.३, धुळे ३६, जेऊर ३६, अमरावती ३६, बुलडाणा ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com