IMD Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पाऊस, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

IMD Alert : आज (ता. १८) विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

Maharashtra Monsoon Update : बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे आलेला मॉन्सूनचा पूर्व भाग पोषक ठरल्याने राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. आज (ता. १८) विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्‍चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. पूर्व टोक त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आले आहे. पूर्व टोक पुढील चार ते पाच दिवस दक्षिणेकडे राहण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस बारबांकी, देहरी, रांची, दिघा ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

मॉन्सून सक्रिय होऊन पावसाचे पुनरागमन होण्याचे संकेत आहेत. राज्यात ढगाळ हवामान होत असून, उकाडा जाणवत आहे. आज (ता. १८) विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

कमी दाब क्षेत्राची होतेय निर्मिती

बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्याच्या प्रभावामुळे आज (ता. १८) कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागर, पूर्व भारतातील राज्यांत ढगांची दाटी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Crop Damage: अवकाळी, गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु, शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषिमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Women Empowerment: महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ देण्यासाठी प्रयत्नशील

Farmer Protest: आंबा, काजू बागायतदारांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला

PAN Card Rules: पॅन कार्ड प्रक्रियेत मोठे बदल; १ एप्रिलपासून नवे नियम लागू, जाणून घ्या माहिती

Sugarcane FRP: सांगलीतील १० कारखान्यांकडे २८० कोटी एफआरपी थकीत

SCROLL FOR NEXT