Maharashtra Monsoon 2023 : पाऊस उद्यापासून वाढणार; कोणत्या भागांमध्ये पाऊस सुरु होणार?

IMD Alert for Maharashtra : आता राज्यात पावसाला पोषक हवामान होतंय. त्यामुळं उद्यापासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
Cloud
CloudAgrowon
Published on
Updated on

IMD Rainfall Alert : मागील तीन आठवड्यांपासून राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत होते. पीक हातची जातात की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. पण आता राज्यात पावसाला पोषक हवामान होतंय. त्यामुळं उद्यापासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

Cloud
Soil Health : कमी पाऊस, चुनखडीयुक्त मातीमधील व्यवस्थापन

हवामान विभागाने उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज जाहीर केला. विदर्भ आणि मराठवड्यात पाऊस सुरु होईल. विदर्भ आणि मराठवड्यात हवामान विभागाने ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्टही दिला.

संपूर्व विदर्भात उद्या येलो अलर्ट आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अदोज आहे.

Cloud
Maharashtra Rain Update : ऑगस्टमध्ये ७० टक्के कमी पाऊस; देशातील तूट ३६ टक्क्यांवर

तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिाकणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यातही उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे.

राज्याच्या इतर भागात हलक्या मध्यम स्वरुपाच्या सरासरी उद्या पडतील. पण शनिवारी या जिल्ह्यांसह लातूर, धाराशिव आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पाऊस वाढेल. शनिवारसाठी या जिल्ह्यांनाही जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

माॅन्सूनची स्थिती काय आहे ते पाहुयात… माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी कायम आहे. हा कमी दाबाचा पट्टा बाराबंकी, देहरी, रांची, दिघा आणि बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागापर्यंत विस्तारला आहे. याच उपसागराच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती दक्षिणेकडे झुकलेली आहे. यामुळे पुढील १२ तासांमध्ये कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com