Rainy Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain : दक्षिण महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Rain Forecast : महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे असलेल्या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

अमोल कुटे

Pune News : मॉन्सूनच्या परतीचा अडखळलेला प्रवास पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. यातच राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. १) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे असलेल्या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावर, तसेच दक्षिण गुजरातमधील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. उत्तर कोकणापासून आग्नेय उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी तापमान पुन्हा ३२ अंशांच्या वर पोचले आहे.

आज (ता. १) कोकणातील सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. नगर, पुणे, सातारा, बीड, धाराशिव, लातूरमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनच्या परतीस पोषक हवामान

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २३) वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला. मंगळवारी (ता. २४) राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियानाच्या काही भागातून मॉन्सून परतला. फिरोजपूर, सिरसा, चूरू, अजमेर, माऊंट आबू, दीसा, सुरेंद्रनगर ते जुनागड पर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा कायम आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राजस्थान, पंजाब, हरियानाच्या आणखी काही भागासह, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशाच्या काही भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान होत आहे.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT