Weather  Agrowon
हवामान

Paus Andaj : राज्यातील १० जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; अनेक भागातील थंडी कमी; ढगाळ वातावरणाचाही अंदाज

Weather Forecast : किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात गारठा काहीसा कमी झाला आहे. पुढील काही दिवस थंडी कमीच राहण्याचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळ निवळतेय. मात्र या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान झाले आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात गारठा काहीसा कमी झाला आहे. पुढील काही दिवस थंडी कमीच राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात मात्र हुडहुडी कायम असल्याचे चित्र आहे. राज्यात आज ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आज सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर तर उद्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

बुधवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात तर गुरुवारीही सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. आज मध्य प्रदेशातील नवगांव येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात थंडी काहीशी कमी झाली असली, तरी धुळे येथील कृषी महाविद्यालयात ७.५ अंशांची नोंद झाली. तर राज्यातील इतर ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Issue: कांद्याच्या प्रश्‍नावर ठोस तोडगा नाही

Khandesh Banana Price: खानदेशात केळीचे दर स्थिर; कमाल भाव २४०० रुपयांपर्यंत

Kisan Sabha Protest: कांद्याला तीन हजार रुपये भावासाठी किसान सभेचे आंदोलन

Pune Dam Water Storage: पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

Water Crisis Protest: पाण्यासाठी रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा

SCROLL FOR NEXT