Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; राज्यात बहुतांशी ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज

Rain Forecast : राज्यातील भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज असून किमान तापमानातही वाढीचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. तर बहुतांशी भागात दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. राज्यातील भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज असून किमान तापमानातही वाढीचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा दोन दिवस थबकला. माॅन्सूनने आतापर्यंत जम्मू आणि काश्मिर, लडाख-गिलगिट-बाल्टीस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाना-चंदीगड-दिल्लीच्या सर्व भागातून माघारी फिरला.  

तर उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या आणखी काही भागातून माघार घेतली. पण आज पुन्हा माॅन्सून एकाच जागेवर होता. म्हणजेच आज माॅन्सून कालच्याच जागेवर होता. त्यामुळे माॅन्सूनच्या परतीची सिमा लखिमपूर खेरी, शिवपुरी, कोटा, उदयपू, दिसा, सुरेंद्रनगर आणि जुनागड दरम्यान होती.

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. हवामान विभगााने आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर उद्या कोल्हापूर सांगली, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

तर रविवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, नगर, बीड, सोलापूर, सांगली, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावासाचा अंदाज देण्यात आला. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT