Weather Update Agrowon
हवामान

Vidarbha Rain : विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

Rain Forecast : विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : कमी दाब क्षेत्र निवळून गेल्यानंतर राज्यात पावसाची उघडीप मिळणार आहे. बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. आज (ता. ५) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता कायम आहे.

राजस्थान आणि मध्य प्रदेश परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून, कोटा, गुना, रामगुंडम, कलिंगपट्टणम ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय असून, बंगालच्या उपसागरात आज (ता. ५) कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे.

पावसाच्या हजेरी व ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार होत आहे. बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३३.८ अंश तापमानाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार, तर विदर्भ, मराठवाड्यात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ५) विदर्भात विजांसह सरींचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT