Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर ओसरला

Rain Update : मराठवाडा, विदर्भात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर जोर ओसरला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
Maharashtra Rain
Maharashtra RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : मराठवाडा, विदर्भात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर जोर ओसरला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंत यवतमाळमधील लडखेड, महागाव येथे १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे अजूनही शेतात पाणीचपाणीच असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

कोकणात कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. पालघरमधील तलसरी येथे ८६ मिलिमीटर, तर झरी ७२, तलवड २५ मिलिमीटर, ठाणेमधील शहापूर, किनहवळी, डोळखांब येथे ३७ मिलिमीटर, रायगडमधील पवयंजे येथे ३१ मिलिमीटर, रत्नागिरीतील लांजा येथे ३१ मिलिमीटर पाऊस पडला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील वैभववाडी येथे ८० मिलिमीटर, तर येडगाव ७१, भुईबावडा ६७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Maharashtra Rain
Marathwada Rain : मराठवाड्यात धो-धो पावसाने शेतशिवार जलमय

मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला. नाशिकमधील नांदगाव येथे ७८ मिलिमीटर पाऊस झाला. तर धुळेतील थाळनेर येथे ४८ मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील कार्ला, लोणावळा येथे ३३ मिलिमीटर, कोल्हापुरातील गगनबावडा येथे ६७ मिलिमीटर, तर चंदगडमध्ये ५३ मिलिमीटर पाऊस झाला.

खानदेशातील नंदुरबारमधील मौलगी, वडफळी येथे ६१ मिलिमीटर, तर नवागाव ३८, चिंचपाडा ५३, मंदाणा ३७, असलोद ३६, तोरणमाळ ५८ मिलिमीटर, जळगावमधील कुऱ्हा, तोंडापूर येथे ४८ मिलिमीटर पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरमधील पिशोर, चिंचोली येथे ७८ मिलिमीटर, तर कन्नड, चापनेर ४३, चिखलठाणा ४० मिलिमीटर पाऊस झाला. नांदेडमध्ये पावसाचा जोर अधिक होता. अर्धापूर येथे सर्वाधिक ९४ मिलिमीटर पाऊस झाला. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम पाऊस झाला.

Maharashtra Rain
Rain Update : नगर जिल्ह्यातील बारा मंडलांत जोरदार पाऊस

तर वाशीम, भंडारा, गोंदिया वर्धा जिल्हयात पावसाचा जोर काहीसा कमी होता. अमरावतीतील रामतीर्थ येथे ८६ मिलिमीटर, तर सामदा ६५ मिलिमीटर, यवतमाळमधील मालखेड येथे ९५ मिलिमीटर पाऊस झाला. नागपूरमधील आडेगाव येथे ४५ मिलिमीटर पाऊस पडला. तर वाशीममधील वाशीम येथे ६०, वारळा ४३, भंडाऱ्यातील बेला येथे ४०, वर्ध्यातील झाडसी येथे ३४ मिलिमीटर, खांढळी ३२, तर गोंदियातील केशोरी, घोटनगाव येथे ५६ मिलिमीटर पाऊस झाला.

मंगळवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये - (स्रोत : कृषी विभाग)

कोकण : पाटगाव, वेंगुर्ला ३१, पोइप ६४, बांदा ३७, मडूरा ३९, शिरोडा ४२, कणकवली, सांगवे ७६, फोंडा ५२, वागदे ४४, कुडाळ ३६, कडावल ५७, कसाल ४७, माणगाव ४३, तळवट ५५, भेडशी ९५,

मराठवाडा : लिंबगाव ५२, पिंपरखेड ६९, किनवट, बोधडी ४७, जलधारा ६५, शिवणी ३३, उमरी ४७, मुदखेड ४३, बारड ५०, वानोळा ४८, मालेगाव ३६.

विदर्भ : असरा ५१, दर्यापूर ४१, खाल्लार ३३, थिलोरी ३२, येवदा ३७, अंजनगाव ३४, यवतमाळ ३४, हिवरी, अर्जुना ५५, अकोला ४९, सावरगड ३४, जाडमोहा ३६, दारव्हा ३७, चिखली ७१, मांगकिन्ही ६१, लोही ७१, बोरी ५३, अर्णी, बोरगाव ३०, नेर ५५, शिरजगाव ४९, मोझर ५५, दारटी ३०, शिरोली ६६, घोटी ३९, सोनगाव ३२, वडोदा ३८, गुमगाव ३९, रामटेक ४१, कान्हान ३३, निमखेडा ३३, मौदा ३८, पाटनसावंगी ३६, कुही ४३, तितूर ३०.

मध्य महाराष्ट्रात नाशिक, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत हलक्या सरी.

मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हलका पाऊस, उर्वरित भागात उघडीप.

यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारदरा, गोंदियात हलक्या सरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com