Rain Forecast Agrowon
हवामान

Awkali Paus : विदर्भात आजही पावसाचा अंदाज; विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट

Weather Forecast : हवामान विभागाने आजही विदर्भातील काही भागात पावसाचा येलो अलर्ट दिला.

Anil Jadhao 

Pune News : मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मागील पाच दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाली. हवामान विभागाने आजही विदर्भातील काही भागात पावसाचा येलो अलर्ट दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्या काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला.

या भागांना येलो अलर्ट देण्यात आला. तर यावेळी या भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा अंदाज देण्यात आला. 

तसेच या जिल्ह्यांमधील इतर भागात ढगाळ वातावरण राहील, असाही अंदाज देण्यात आला. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहतील, असा अंदाज आहे. तर राज्यातील कमाल तापमानात पुन्हा चांगलीच वाढ झाली.

बहुतांशी भागांमध्ये कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त दिसते. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा वाढ दिसेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT