Warmest Year 2023 : सावधान… जगाला धोक्याची घंटा; जागतिक तापमान धोक्याच्या पातळीवर; दुष्काळ, पुराचे प्रमाण वाढले

Weather Update : जागतिक हवामान विभागाने जगाला धोक्याची घंटा दिली. आपल्या अहवालात जागतिक तापमान २०२३ मध्ये तब्बल दीड टक्क्याने वाढून आतापर्यंतचे विक्रमी उष्ण वर्ष ठरल्याचे स्पष्ट केले.
Weather
Weather Agrowon

Pune News : जागतिक हवामान विभागाने जगाला धोक्याची घंटा दिली. आपल्या अहवालात जागतिक तापमान २०२३ मध्ये तब्बल दीड टक्क्याने वाढून आतापर्यंतचे विक्रमी उष्ण वर्ष ठरल्याचे स्पष्ट केले.

चालू वर्षातील दोन महिनेही उष्ण ठरले. यामुळे जगाची चिंता वाढली. या तापमान वाढीमुळे दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढल्याचे जागतिक हवामान विभागाने म्हटले आहे. याचा परिणाम जिवनमानावर तर होतच आहे शिवाय शेती आणि इतर संपत्तीचे नुकसान होत असल्याने आर्थिक हानी देखील वाढत आहे.

वातावरण बदलाचा माॅन्सूनवर देखील परिणाम होत आहे. त्यामुळे भारतासह आशियातील पावसाच्या प्रमाणात आणि वितरणात बदल दिसून येत आहेत. एका भागात एकदम जास्त पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ अशा घटना वाढत आहेत. अचानक मोठा पाऊस होऊन पूर येणे, कमी दिवसात जास्त पाऊस पडणे, पावसात मोठे खंड पडणे, अशा घटना वाढत आहेत.  

विशेष म्हणजे तापमान वाढीपेक्षा वातावरणातील बदल झपाट्याने होत आहेत. त्यामुळे जगाच्या पाठीवर उष्णतेच्या लाटा, पुराच्या घटना, दुष्काळी स्थिती, जंगलात वणवे लागणे आणि तीव्र स्वरुपाची चक्रीवादळे यामुळे जगाला हैरान केले आहे. या घटना २०२३ मध्ये जास्त जाणवल्या. यामुळे मानवी जिवन विस्कळीत झाले, आर्थिक हानीही वाढली, असेही जागतिक हवामान विभागाने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

Weather
Weather Forecast : विदर्भात वादळी पावसाचा इशारा

तापमान वाढीमुळे शेतीही खूपच आव्हानात्मक ठरत आहे. जागतिक हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे केवळ भारतच नाही जगातील सर्वच देशांमधील शेती आणि शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसला. त्यातही भारतातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली. 

जगासाठी २०२३ हे सर्वाधिक उष्ण वर्ष असले तरी भारतासाठी दुसरे उष्ण वर्ष आहे. कारण १९०१ हे वर्ष भारतासाठी उष्ण होते. जागतिक हवामान विभागाने स्पष्ट केले की, सर्वच हवामान निर्देशक म्हणजेच हरितगृह वायू, समुद्राचे तापमान, समुद्राच्या पाणीपातळीत वाढ, अंटार्टीकातील बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. 

Weather
Weather Forecast : विदर्भ, मराठवाड्यात पाऊस, गारपिटीचा इशारा कायम

जागतिक हवामान विभागाच्या सचिव आंद्रिया सेलेस्टे साऊलो म्हणाल्या की, या अहवालाकडे जगाने रेड अलर्ट म्हणून पाहिले पाहिजे. उष्णतेचे रेकॉर्ड पुन्हा एकदा मोडीत निघाले. एकूणच, हे सर्व चिंतेचे कारण आहे. गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटेने जागतिक महासागराचा जवळजवळ एक तृतीयांश भाग व्यापला होता.

मागील ९ वर्षांचा विचार केला तर या काळात विक्रमी उष्ण वर्षांची नोंद झाली. तर २०१४ ते २०२३ या दशकाचे तापमान आतापर्यंतचे विक्रमी होते. म्हणजेच मागील दशक हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण दशक ठरले. २०२२ मध्ये तर तीन प्रकारचे हरितगृह वायू उच्चांकी वाढले होते. त्यात कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन आणि नायट्रोस ऑक्साईड या वायूंचा समावेश आहे. तसेच या वायूंचे प्रमाण २०२३ मध्येही जास्त होते, असेही जागतिक हवामान विभागाने स्पष्ट केले. 

जागतिक हवामान विभागाने म्हटले की, जेव्हापासून जागतिक तापमानाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाली तेव्हापासून म्हणजेच १७४ वर्षांतील सर्वाधिक उष्ण वर्ष २०२३ ठरले.  २०२३ मध्ये जागतिक तापमान १.५ अंश सेल्सिअसने जास्त होते. यापुर्वी २०१६ हे सर्वाधिक उष्ण वर्ष होते. तापमान वाढीची ही पातळी धोक्याच्या पातळीवर पोचली आहे, असेही जागतिक हवामान विभागाने स्पष्ट केले. 

युनायटेड नेशन्सचे अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, या अहवालावरून आपली पृथ्वी नामशेष होण्याच्या मार्गाने वाटचाल करत असल्याचे दिसते. जीवाश्म इंधन प्रदूषण चार्ट हे दर्शविते की हवामानाचे किती नुकसान होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com