Rain Update
Rain Update Agrowon

Weather Forecast : विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Weather News : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा सुरूच आहे. यातच उन्हाच्या झळा कायम असून, उकाड्यात वाढ झाली आहे.
Published on

Pune News : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा सुरूच आहे. यातच उन्हाच्या झळा कायम असून, उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. २०) विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

विदर्भ आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण दक्षिण अंतर्गत कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. सोमवारी (ता. १८) विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २०) विदर्भात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

Rain Update
Weekly Weather : मध्य विदर्भात अल्पशा पावसाची शक्यता

मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाची ताप वाढण्याचा अंदाज आहे.

Rain Update
Weather Forecast : विदर्भ, मराठवाड्यात पाऊस, गारपिटीचा इशारा कायम

मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.४, नगर ३५.१, धुळे ३६.५, जळगाव ३५.७, कोल्हापूर ३६.५, महाबळेश्वर २९.५, नाशिक ३४.०, निफाड ३४.१, सांगली ३६.३, सातारा ३५.५, सोलापूर ३९.०, सांताक्रूझ ३२.०, डहाणू ३२.६, रत्नागिरी ३२.२,

छत्रपती संभाजीनगर ३५.२, परभणी ३८.१, अकोला ३८.१, अमरावती ३५.६, बुलढाणा ३५.५, ब्रह्मपूरी ३७.०, चंद्रपूर ३६.६, गडचिरोली ३६.०, गोंदिया ३४.४, नागपूर ३४.५, वर्धा ३५.९, वाशीम ३८.६, यवतमाळ ३६.७.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com