Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Paus Andaj : राज्यात काही भागात पावसाचा अंदाज; पुढील ५ दिवस राज्यात विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update : हवामान विभागाने पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावारण होते. हवामान विभागाने पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. 

माॅन्सूनने काल उत्तर भारतातील काही भागातून आपला मुक्काम हलविला होता. माॅन्सूनने परतीचा प्रवास सुरु केल्यानंतर २३ आणि २४ सप्टेंबरला काही भागातून काढता पाय घेतला होता. मात्र त्यानंतर माॅन्सून एकाच जागेवर खिळून होता. पण तब्बल ७ दिवसांनंतर काल माॅन्सूनने मोठी चाल केली. काल माॅन्सून जम्मू आणि काश्मिर, लडाख-गिलगिट-बाल्टीस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाना-चंदीगड-दिल्लीच्या सर्व भागातून माघारी फिरला होता.

तर उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या आणखी काही भागातून माॅन्सून माघारी फिरला. पण आज पुन्हा माॅन्सून एकाच जागेवर होता. म्हणजेच आज माॅन्सून कालच्याच जागेवर होता. त्यामुळे माॅन्सूनच्या परतीची सिमा लखिमपूर खेरी, शिवपुरी, कोटा, उदयपू, दिसा, सुरेंद्रनगर आणि जुनागड दरम्यान होती.

हवामान विभागाने कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. उद्या पुणे आणि सातारा तसेच धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावासाही अंदाज हवामान विभागाने दिला.

शनिवारी आणि रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT