Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा प्रवास पुन्हा सुरू केला आहे. बुधवारी (ता. २) वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतला. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग येण्याची चिन्हे असून, दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांतून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) २३ सप्टेंबर रोजी वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला. २४ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून मॉन्सून परतल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थबकली. बुधवारी (ता. २) तब्बल आठ दिवसांनी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे.
मॉन्सूनने संपूर्ण जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, दिल्ली राज्यासह, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या काही भागांतून माघार घेतली आहे. लखीमपूर, खेरी, शिवपुरी, कोटा, उदयपूर, दिसा, सुरेंद्रनगर, जुनागडपर्यंतच्या भागांतून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
मॉन्सूनचा परतीचा पुढील प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत. परतीस पोषक हवामान झाल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत राजस्थानच्या उर्वरित भागासह, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.