Weather report today : हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. पण राज्यातील बहुतांशी भागात पाऊस नव्हता. तसेच हवामान विभागाने पुढील चार दिवसही राज्यातील अनेक भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.
हवामान विभागाने आज विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच उद्या म्हणजेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेडया जिल्ह्यांमध्येही उद्या ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यात विजांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर भागातही ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच सोमवारी संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.
मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी आणि बुधवारीही संपूर्ण विदर्भ आणि मराठवड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.