September Monsoon Rain: शेतकऱ्यांची चिंता वाढली; राज्यात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार : हवामान विभागाचा अंदाज

September Rain: सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीच्या ९१ ते १०९ टक्के पावसाचा अंदाज. ऑगस्ट महिन्यात १२२ वर्षातील सर्वात कमी पाऊस पडला.
Monsoon
Monsoon Agrowon
Published on
Updated on

पुणेः हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. परंतु राज्यात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. या अंदाजामुळे राज्यात दुष्काळाचे संकट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होईल. दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल; परंतु पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरूवारी (ता. ३१) जाहीर केला आहे.

देशात मात्र सप्टेंबर महिन्यात सरासरीएवढा पाऊस होण्याचा अंदाज आहे. ईशान्य भारतात सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे.

ऑगस्टच्या शेवटी आयओडी सक्रिय झाला. त्यामुळे देशात सप्टेंबर महिन्यात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीच्या ९१ ते १०९ टक्के पाऊस पडेल. ईशान्य भारत, पूर्व भारत, हिमालयाचा पायथा आणि दक्षिण द्विपकल्पात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. तर देशाच्या इतर भागात सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Monsoon
September Rain: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा, कोकणात पाऊस सुरु होणार: हवामान विभागाचे संकेत

देशात ऑगस्ट महिन्यात पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तर पश्चिम बंगाल, केरळ, लक्षद्वीप, कर्नाटका, मध्य महाराष्ट्र, मराठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. तर इतर विभागांमध्ये सरासरी पाऊस पडला, असे हवामान विभागाने म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यात देशात सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी पाऊस झाला. मध्य भारतात सरासरीच्या तुलनेत ४७ टक्के कमी पाऊस झाला. तर दक्षिण भारतातील पाऊस सरासरीपेक्षा ६० टक्के कमी पडला. १ जून ते ३१ ऑगस्ट या काळात देशात सरासरीपेक्षा १० टक्के कमी पाऊस पडला, असेही हवामान विभागाने सांगितले.

माॅन्सून हंगामातील आतापर्यंत पावसाचा विचार करता देशात १० टक्के तूट आली आहे. दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात आतापर्यंत सरासरीपेक्षा १७ टक्के कमी पाऊस पडला. तर मध्य भारतातील पाऊसमान १० टक्क्यांनी कमी आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com