Rain  Agrowon
हवामान

Paus Andaj : राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Rain Update : हवामान विभागाने राज्यातील काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : हवामान विभागाने राज्यातील काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर दुपारी ऑक्टोबर हीटही जाणवत आहे. दुसरीकडे माॅन्सूनचा परतीचा प्रवास सलग पाचव्या दिवशी म्हणजेच आजही थबकलेला होता. 

माॅन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा थबकला आहे. माॅन्सूनने आतापर्यंत जम्मू आणि काश्मिर, लडाख-गिलगिट-बाल्टीस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाना-चंदीगड-दिल्ली आणि राजस्थानच्या सर्व भागातून माघारी फिरला. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून माघार घेतली. पण ५ दिवसांपासून माॅन्सून एकाच जागेवर आहे.

म्हणजेच आजही माॅन्सूनची सिमा नौटनवा, सुलतानपूर, पन्ना, नरमदापुरम, खरगोन, नंदूरबार आणि नवसारी भागात होती. माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये गुजरात, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून माघारी फिरेल. तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

शनिवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. रविवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT