Monsoon Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon Rain: विदर्भात ३ दिवस पावसाचा अंदाज; राज्याच्या इतर भागात पावसाचे जोर कमीच राहण्याची शक्यता

IMD Forecast: हवामान विभागाने पुढील ५ दिवस विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. तर राज्याच्या इतर भागातही पावसाचे प्रमाण कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात पावसाचा जोर कमी होऊन काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस कमी आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. तर राज्याच्या इतर भागातही पावसाचे प्रमाण कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज नागपूर, भंडारा, रत्नागिरी आणि रायगड तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि कोकणातील इतर जिल्हे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

शुक्रवारी विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर राज्याच्या इतर भागात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

शनिवारी आणि रविवारी पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. तर विदर्भातील इतर जिल्हे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT