Maharashtra Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पावसाची उघडीप शक्य

Rain Update : आज (ता. १२) पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

अमोल कुटे

Pune News : मध्य भारतात असलेले कमी दाब क्षेत्र ओसरल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. आज (ता. १२) पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय मध्य प्रदेश आणि परिसरावर ठळक कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढली आहे. मध्य प्रदेशच्या दामोहपासून पूर्वेकडे ६० किलोमीटर, खजुराहो पासून ११० किलोमीटर दक्षिणेकडे, तर सतनापासून ११० किलोमीटर पूर्वेकडे असलेली ही प्रणाली हळूहळू वायव्येकडे सरकत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, सिकार, सिवपुरी, तीव्र कमी दाबाचे केंद्र (डिप्रेशन) ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील अलिबाग येथे राज्यातील उच्चांकी ३३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने विदर्भाच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहेत. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. १२) पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसर हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पुणे, सातारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT