Agriculture Service Center
Agriculture Service CenterAgrowon

Rain Update : पावसाच्या हजेरीने कृषी केंद्रांवर झुंबड

Weather Update : बळीराजासहित सर्वच नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. शहापूर परिसरात तीन दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पावसाने वेळेवर सुरुवात केल्याने शेतकरी सुखावला आहे.
Published on

Mumbai News : बळीराजासहित सर्वच नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. शहापूर परिसरात तीन दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पावसाने वेळेवर सुरुवात केल्याने शेतकरी सुखावला आहे. तसेच उकाड्याने हैराण झालेले नागरिकही आनंदी झाले आहेत. शैक्षणिक, शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे.

Agriculture Service Center
Monsoon Rain : मराठवाड्याला पावसाने धुतले

ग्रामीण परिसरात पावसाने रिपरिप सुरू केल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळित झाले आहे. तर शेतकरी भातपेरणीच्या कामाला लागला आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबाची लगबग सुरू आहे.

Agriculture Service Center
Agriculture Inputs : शेतकऱ्यांना रास्त दराने निविष्ठा विका, पावती द्या

पेरणी कामे पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टर आणि बैलाच्या साह्याने नांगरणी, कुळवण करून शेतामधील तणाने व्यापलेल्या जमिनीचे वेचणीचे काम सुरू केले आहे. कृषी केंद्रावर बियाणे खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.

जिल्हा परिषद सेस निधीतून ५० टक्के अनुदानाने कर्जत-३ आणि एमटीयू-१०१० या वाणाचे भात बियाणे उपलब्ध असून त्याची विक्री शहापूर पंचायत समितीमध्ये सुरू आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर एका शेतकऱ्याला साधारण ३० किलोप्रमाणे वाटप सुरू आहे.
विकास झुंजारराव, कृषी अधिकारी, शहापूर पंचायत समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com