Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

Rain Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : अरबी समुद्र आणि पश्‍चिम बंगालमधील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. २४) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, ही प्रणाली झारखंडकडे सरकत आहे. यातच अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली निवळत आहे.

या प्रणालीपासून केरळच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या बिकानेरपासून, सिकार, ओराई, चुर्क, देहरी, कमी दाबाचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३५.६ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३४ अंशांच्या वर आहे. ढगाळ हवामानामुळे उकाड्यातील वाढ कायम आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. २४) राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) आहे, तर उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, वर्धा, नागपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदुरबार, धुळे, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Electric Tractor Subsidy : इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला अनुदान, एआयचा वापर आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहनाची शिफारस; स्थायी समितीचा अहवाल सादर

Soybean Procurement: पाच लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी शिल्लक आहे का?; पणनमंत्र्यांचा मोठा खुलासा

Organic Turmeric Branding: वाशीमच्या सेंद्रिय हळदीचे होणार ब्रँडिंग

Farmer Struggle Story: कैलास नागरेंच्या बलिदानाची वर्षपूर्ती

Soil Health: एकात्मिक खत व्यवस्थापनातून राखा जमिनीचे आरोग्य

SCROLL FOR NEXT