Monsoon Rain : खानदेशात आठवडाभरानंतर पाऊस

Delayed Rainfall : खानदेशात मागील सात ते आठ दिवस अपवाद वगळता पाऊस नव्हता. आठवडाभरानंतर पावसाने अनेक भागांत हजेरी लावली आहे.
Monsoon Delay
Monsoon DelayAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात मागील सात ते आठ दिवस अपवाद वगळता पाऊस नव्हता. आठवडाभरानंतर पावसाने अनेक भागांत हजेरी लावली आहे. काही भागांत तुरळक तर काही भागांत मध्यम पाऊस झाला.

जळगाव, धुळे जिल्ह्यात सोमवारी (ता. १९) दुपारी व सायंकाळी पाऊस झाला. जळगावातील धरणगाव, अमळनेर, एरंडोल, भुसावळ, चोपडा, पारोळा, जळगाव, धुळ्यातील धुळे, साक्री आदी भागांत मध्यम ते हलका पाऊस झाला. रात्रीही काही भागांत सरी बरसल्या. मागील आठ दिवस ऊन व उकाडा अशी स्थिती होती.

Monsoon Delay
Rain Update : सणसरमध्ये ९५ मिलिमीटर पावसाची नोंद

शेतकऱ्यांना निरभ्र वातावरणाची प्रतीक्षा होती. परंतु ढगाळ वातावरण कायम होते. प्रचंड उकाडा व ऊन यामुळे शेतीकामांवरही परिणाम होत होता. अनेक शेतकरी सकाळी व सायंकाळी शेतीकामे उरकून घेत होते. कापूस, सोयाबीन, मका आदी पिकांत खते देण्यासह तणनियंत्रण. फवारणीची कामे सुरू होती. काही भागात कापूस पिकात आंतरमशागत करण्यासही वेग आला.

काळ्या कसदार जमिनीत वाफसा चांगला होता. पाऊस आणखी पाच ते सात दिवस नको, असेही शेतकरी म्हणत होते. कारण काळ्या कसदार जमिनीतील सखल भागात वाफसा नसल्याने त्यात आंतरमशागत पूर्ण होऊ शकली नव्हती. परंतु मुरमाड, हलक्या जमिनीत पिकांची स्थिती नाजूक बनत होती. यामुळे हलक्या, मुरमाड जमिनीत केळी, पपई उत्पादकांनी पिकांचे सिंचन सुरू केले होते. तर कोरडवाहू शेतीधारक पावसाच्या प्रतीक्षेत होते. कारण सोयाबीन, उडीद पिकांत शेंगा पक्व होण्याची अवस्था आहे. मका पिकातही दाणे भरू लागले आहेत.

Monsoon Delay
Maharashtra Rain : राज्यात तुरळक ठिकाणी धो धो पाऊस

कांदेबाग केळी पिकातही घड पक्व होत आहेत. तर पपईसही फुलोरा व फळांची अवस्था असल्याने पावसाच्या पाण्याची गरज होती. उष्णता व उकाडाही वाढला होता. सकाळी निरभ्र वातावरण असायचे. दुपारी मात्र ढगाळ वातावरण व उकाडा अशी स्थिती तयार होत होती. यामुळे पावसाची प्रतीक्षा अनेक भागांत होती.

सोमवारी दुपारी व सायंकाळी पाऊस झाला. परंतु सर्वत्र हा पाऊस नव्हता. धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर भागात तुरळक पाऊस झाला. धुळ्यातील नेर, कुसुंबा, कापडणे, लामकानी भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. खानदेशात कुठेही २५ मिलिमीटरपेक्षा अधिकचा पाऊस सोमवारी झाला नसल्याची माहिती मिळाली. नंदुरबारातील नवापूर, नंदुरबार भागातही तुरळक पाऊस झाला.

नंदुरबारातही सर्वत्र पाऊस नव्हता. भुसावळातील कुऱ्हेसह अन्य गावांत सुमारे १५ मिनिटे चांगला पाऊस झाला. चोपड्यातही तापीकाठावरील सनपुले, कठोरा भागात सोमवारी रात्री चांगला पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com