Rain Update : पावसाची उघडीप; तुरळक ठिकाणी पाऊस

Maharashtra Rain News : राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी होत आहे. तर मध्य महाराष्ट्रात व खानदेशात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी होत आहे. तर मध्य महाराष्ट्रात व खानदेशात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर गुरुवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत डुंगरवाडी घाटमाथ्यावर ८२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

कोकण, मराठवाडा व विदर्भात पावसाचे प्रमाण असून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. गुरुवारी दुपारनंतर पुणे परिसरात हलक्या सरी पडल्या. त्यामुळे धरणांत अजूनही कमीअधिक प्रमाणात आवक सुरू आहे.

मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. यामध्ये किन्हई, वडूज, कातरखटाव येथे ५४ मिलिमीटर, तर चाफळ ४७, इंदोली ४७, दहिवडी ३६, गोंदावले वर्ये ३२, कुक्‍कुडवाड, ओझर्डे ३३, कुमठे २४, पाचवड, भुईज येथे २३ मिलिमीटर, नाशिकमधील कौळाणे येथे ४१ मिलिमीटर, तर देवळा ३५, सायणे ३०, मालेगाव, सौंदाणे २४ मिलिमीटर, नगरमधील जेऊर येथे २२ मिलिमीटर, तर दैवदैठण २७, सलाबतपूर, चांदा येथे २० मिलिमीटर, सोलापुरातील शिवणे येथे ४१ मिलिमीटर, तर सोलापूर, मंद्रूप, म्हैसगाव, भाळवणी, सांगोला येथे हलका पाऊस झाला.

Rain Update
Rain Update: शनिवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

सांगलीतील तिकोंडी येथे ४२ मिलिमीटर, तर कुची ४१, संख येथे २४ मिलिमीटर, कोल्हापुरातील महागाव येथे ४० मिलिमीटर, तर बाजार ३२, गडहिंग्लज २४, कडगाव २३, कळे येथे २० मिलिमीटर पाऊस झाला.

खानदेशातही पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. धुळेतील ब्राह्मणवेल येथे ३९ मिलिमीटर, नंदुरबारमधील आष्टे येथे ६२ मिलिमीटर, खांडबारा ५२ मिलिमीटर, जळगावमधील पहूर येथे २३ मिलिमीटर पाऊस पडला असून अनेक ठिकाणी कडक ऊन पडले होते.

कोकणात मागील पाच ते सहा दिवस कमीअधिक स्वरूपात पाऊस पडला. त्यामुळे भात पिकांना चांगलाच दिलासा मिळाला होता. परंतु आता या भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरीत पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तर सिंधुदुर्ग, पालघरमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील देहरी येथे २९ मिलिमीटर, सरळगाव येथे २० मिलिमीटर, सिंधुदुर्गमधील आबोली येथे २२ मिलिमीटर, कणकवली, फोंडा, सांगवे २७, तळवट २२, भेडशी येथे २० मिलिमीटर, पालघरमधील मोखडा, खोडला येथे ३४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे या भागात नद्या अजूनही भरून वाहत आहेत.

Rain Update
Rain Update : मध्य महाराष्ट्र, खानदेशात जोरदार पाऊस

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा येथे २३ मिलिमीटर, तर पिशोर ३०, चिचोली लिंबाजी, करंजखेड येथे २८ मिलिमीटर, बीडमधील कावडगाव येथे २३ मिलिमीटर, लातूरमधील जळकोट येथे ६९ मिलिमीटर, तर घोणशी ३६, मोघा येथे २२ मिलिमीटर, नांदेडमधील मुखेड, बारूळ, चांडोळा, पेठवडज येथे ५३, तर जांब ५०, येवती, जाहूर येथे २९ मिलिमीटर पाऊस झाला.

विदर्भात अकोला, वाशीम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये हलक्या सरी पडल्या. यात अकोल्यातील पाथर्डी येथे २२ मिलिमीटर, वाशीममधील पोटी येथे ३३ मिलिमीटर, अमरावतीतील धानोरा गुरव येथे ५६ मिलिमीटर, तर माहुली चोर ३९ मिलिमीटर, नागपूरमधील नागरधन येथे ३५ मिलिमीटर, कन्हान येथे ४१ मिलिमीटर, भंडाऱ्यातील कोंढा येथे ५८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीत पावसाने विश्रांती दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com