Weather  Agrowon
हवामान

October Heat : ‘ऑक्टोबर हीट’चा पारा पस्तिशीपार

Weather Forecast : राज्यात पावसाने उघडीप देताच, कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. ‘ऑक्टोबर हीट’ने चटका वाढल्याने तापमानाचा पारा पस्तिशीपार गेला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पावसाने उघडीप देताच, कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. ‘ऑक्टोबर हीट’ने चटका वाढल्याने तापमानाचा पारा पस्तिशीपार गेला आहे. आज (ता. ३) सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह उन्हाचा चटका कायम राहण्याचा शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर कोकणापासून आग्नेय उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. राज्यात पावसाने उघडीप दिली असून, उन्हाचा चटका वाढला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच ‘ऑक्टोबर हीट’ अनुभवायला मिळत आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. यातच पहाटेच्या वेळी दव पडल्याचे दिसत असून, उकाड्यात वाढ झाल्याने घाम निघत आहे.

मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा येथे पारा पस्तिशीपार गेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान पुन्हा ३३ अंशांच्या वर पोहोचले आहे. आज (ता.३) सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३४.९, जळगाव ३३.६, कोल्हापूर ३३.८, महाबळेश्‍वर २८, मालेगाव ३१.६, नाशिक ३२.७, निफाड ३०.५, सांगली ३३.९, सातारा ३२.७, सोलापूर ३५.४, सांताक्रूझ ३३.५, डहाणू ३२.९, रत्नागिरी ३३.२, छत्रपती संभाजीनगर ३३.४, बीड ३२.६, धाराशिव ३३.७, परभणी ३५.४, अकोला ३५.८, अमरावती ३३.४, भंडारा ३२, बुलडाणा ३२.२, ब्रह्मपुरी ३५.२, चंद्रपूर ३३.६, गडचिरोली ३३.६, गोंदिया ३४.२, नागपूर ३५.०, वर्धा ३५, वाशीम ३२.८, यवतमाळ ३४.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

आग्नेय बांगलादेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून उत्तर अंदमान समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत (ता. ४) उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

३५ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे

जेऊर ३६.५, सोलापूर ३५.४, परभणी ३५.४, अकोला ३५.८, ब्रह्मपुरी ३५.२, नागपूर ३५, वर्धा ३५.

विजांसह पावसाचा अंदाज

सातारा, सांगली, कोल्हापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT