Rain Update : परभणी, हिंगोलीत २५ मंडलात सरासरीहून कमी पाऊस

Rain News : जून ते सप्टेंबर या ४ महिन्याच्या कालावधीत परभणी जिल्ह्यामध्ये सरासरी ७६१.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : जून ते सप्टेंबर या ४ महिन्याच्या कालावधीत परभणी जिल्ह्यामध्ये सरासरी ७६१.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे.परंतु यंदा ८२७.३ मिलिमीटर (१०८.७ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ७९५.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे.परंतु यंदा प्रत्यक्ष्यात ८९१.३ मिलिमीटर (११२.१ टक्के) पाऊस झाला.

या कालावधीत यंदा परभणी जिल्ह्यात ६६ मिलिमीटर तर हिंगोली जिल्ह्यात ९६ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. परंतु या कालावधीत परभणी जिल्ह्यातील १८ मंडलात आणि हिंगोली जिल्ह्यातील ७ मिळून दोन जिल्ह्यातील एकूण २५ मंडलामध्ये सरासरीहून कमी पाऊस झाला आहे.

सप्टेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यातील सरासरी १६९.० मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. यावर्षी २६७.९ मिलिमीटर (१५८.५ टक्के) पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ८४.३ मिलिमीटर पाऊस जास्त झाला. सप्टेंबर मध्ये ५२ पैकी पूर्णा (८९.२ टक्के) आणि लिमला (९०.३ टक्के) या मंडलात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत ५२ पैकी १८ मंडलात कमी पाऊस झाला.

Rain Update
Rain Update : मंडळांनी ओलांडली पावसाची सरासरी

त्यात परभणी शहर ९३.४ टक्के, परभणी ग्रामीण ८६.५ टक्के, पेडगाव ८८.६ टक्के, जांब ८८.४ टक्के, सिंगणापूर ८७.८ टक्के, पिंगळी ७५.१ टक्के, टाकळी कुंभकर्ण ८८.९ टक्के, सेलू ९०.५ टक्के, देऊळगाव गात ९७.८ टक्के, कुपटा ९३.७ टक्के, कोल्हा ९९.६ टक्के, हादगाव ८८.१ टक्के, चाटोरी ९७.६ टक्के, पूर्णा ७८.५ टक्के, लिमला ९०.७ टक्के, कात्नेश्वर ८२.३ टक्के, चुडावा ९६ टक्के, कावलगाव ८७.३ टक्के हि मंडले आहेत. जिल्ह्यात यंदा केवळ ऑगस्ट महिन्यात सरासरीहून कमी पाऊस झाला.

Rain Update
Kolhapur Rain Update : कोल्हापुरला पावसाने झोडपले, आणखी दोन दिवस वादळी पावसाची शक्यता

सप्टेंबर महिन्यात हिंगोली जिल्ह्यात सरासरी १५४.७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. यंदा प्रत्यक्षात ३१५.७ मिलिमीटर (२०४.१ टक्के) पाऊस झाला. यंदा सप्टेंबर महिन्यात सर्व ३० मंडलात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. जून ते सप्टेंबर या कालावधीत ३० पैकी ७ मंडलात सरासरीहून कमी पाऊस झाला. त्यात खंबाळा ९४.३ टक्के, वसमत ९५ टक्के,हयातनगर ८४.७ टक्के, हट्टा ८७.२ टक्के, टेंभुर्णी ९१.६ टक्के, आजेगाव ९४.२ टक्के, साखरा ९७.८ टक्के हि मंडले आहेत. यंदा जिल्ह्यात जून व ऑगस्ट महिन्यात कमी तर जुलै व सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस झाला.

सप्टेंबर महिना तुलनात्मक पाऊस स्थिती

(मिलीमीटरमध्ये) परभणी जिल्हा

वर्षे सरासरी पाऊस प्रत्यक्ष पाऊस टक्केवारी

२०२० १६९.० २५८.१ १५२.७

२०२१ १६९.० ३८३.१ २२६.७

२०२२ १६९.० १४०.७ ८३.३

२०२३ १६९.० १८३.७ १०८.७

२०२४ १६९.० २६७.९ १५८.७

(मिलीमीटरमध्ये)हिंगोली जिल्हा

वर्षे सरासरी पाऊस प्रत्यक्ष पाऊस टक्केवारी

२०२० १५४.७ २५६.३ १६५.७

२०२१ १५४.७ ३६८.८ २३८.४

२०२२ १५४.७ १५४.२ ९९.७

२०२३ १५४.७ २३२.५ १५०.३

२०२४ १५४.७ ३१५.७ २०४.१

जून ते सप्टेंबर तालुकानिहाय

पाऊस स्थिती (मिलीमीटरमध्ये)

तालुका सरासरी पाऊस प्रत्यक्ष पाऊस टक्केवारी

परभणी ८११ ७५८.९ ९३.६

जिंतूर ७३३.४ ८४८.० ११५.६

सेलू ७३७.३ ७७७.१ १०५.४

मानवत ७३२.२ ८५७.३ ११७.१

पाथरी ७३९.५ ८६०.२ ११६.३

सोनपेठ ६७९.६ ९०८.२ १३३.६

गंगाखेड ७२५.७ ९६०.४ १३२.३

पालम ७३८.९ ८४६.० ११४.५

पूर्णा ८०७.० ७२७.१ ९०.१

हिंगोली ८६७.९ ९५४.८ ११०.०

कळमनुरी ७९५.४ ९५०.२ ११९.५

वसमत ८२४.० ८४६.७ १०२.७

औंढा नागनाथ ७३६.१ ८५४.२ ११६.०

सेनगाव ७२९.७ ८३७.७ ११४.८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com