Monsoon Agrowon
हवामान

Vidarbha Monsoon Update : विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ; मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

Vidarbha Monsoon Return : दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Swapnil Shinde

Vidarbha News : मॉन्सून परतल्यानंतर राज्यात बहुतांश भागात उष्ण व कोरडे हवामान झाले आहे. बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ११) राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तेलंगणा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून कोमोरिन पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

ऑक्टोबर हीटचा चटका वाढल्याने राज्यात उन्हाची ताप वाढली आहे. अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम आहे. अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांच्या वर आहे. मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला, ब्रह्मपूरी, वर्धा, सोलापूर, यवतमाळ येथे तापमान ३६ अंशांच्या पुढे होते. आज (ता. १२) राज्यात मुख्यतः उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. ९) बहुतांश महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. विदर्भ आणि कोकणाचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतला आहे. बुधवारी (ता. १०) मॉन्सूनची परतीची सीमा कायम होती. दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.६, जळगाव ३५.६, कोल्हापूर ३२.६, महाबळेश्वर २५.७, नाशिक ३२.७, सांगली ३३.८, सातारा ३३.७, सोलापूर ३६.०, सांताक्रूझ ३४.८, डहाणू ३३.०, रत्नागिरी ३२.८, छत्रपती संभाजीनगर ३४.१, नांदेड ३५.०, परभणी ३५.८, अकोला ३७.२, अमरावती ३५.६, बुलडाणा ३३.९, ब्रह्मपूरी ३६.१, चंद्रपूर ३५.४, गडचिरोली ३५.४, गोंदिया ३५.०, नागपूर ३५.५, वर्धा ३६.१, वाशीम ३५.२, यवतमाळ ३६.०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT