Monsoon  Agrowon
हवामान

Weekly Weather : राज्यात ईशान्य मॉन्सून दाखल

Weather Update : विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्राचे पूर्व भागातून ते तमिळनाडूच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर ढग वाहून आणतील. महाराष्ट्राच्या पूर्व भागात आजपासून पुढे ईशान्य मॉन्सूनचा पाऊस अधूनमधून होत राहील.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Agriculture Weather : महाराष्ट्रावर आठवडाभर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तसेच बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे वारे तेथे ईशान्येकडून भारताचे पूर्वभागावरून दक्षिणेच्या दिशेने वाहतील. सोबत मोठ्या प्रमाणावर ढग वाहून आणतील. विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्राचे पूर्व भागातून ते तमिळनाडूच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर ढग वाहून आणतील. महाराष्ट्राच्या पूर्व भागात आजपासून पुढे ईशान्य मॉन्सूनचा पाऊस अधूनमधून होत राहील.

सूर्याचे दक्षिणायन सुरू झाले असून सूर्याचा कोन दक्षिणेकडे सरकत जाईल तसे तापमान वाढेल. हवेचे दाब कमी होतील आणि जोराचे पाऊस होतील. यालाच परतीचा मॉन्सून म्हणून संबोधतो. ईशान्य मॉन्सूनचा पाऊस सर्वसाधारणपणे ८ ते १० ऑक्टोबरपर्यंत राज्यात होतो. मात्र तो तमिळनाडूमध्ये नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत बरसतो. हा पाऊस तमिळनाडूमध्ये बराच काळ असतो. १८ डिसेंबर २०२३ मध्ये कयालपट्टनम येथे ९४.६ सेमी पाऊस झाला होता. हे सर्व हवामान बदलाने घडले. ईशान्य मॉन्सूनचा पाऊस लागून राहत नाही. जोराचा पाऊस होतो आणि उघडतो. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी दिसते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ईशान्य मॉन्सूनचा जोर राहील.

कोकण

आज व उद्या (ता. २२,२३) रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत प्रतिदिन १ ते ३ मिमी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३ ते ५ मिमी व पालघर जिल्ह्यात २ ते ३ मिमी पावसाची शक्यता आहे. बराच काळ उघडीप व क्वचित वेळा अल्पशा पावसाची शक्यता राहील. यावरून नैॡत्य मॉन्सूनचा जोर कमी झाला असल्याचे दिसून येते. अद्यापही वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ८४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८६ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

आज व उद्या (ता. २२,२३) धुळे व नंदूरबार जिल्ह्यात १ मिमी, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत २ ते ५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा धुळे व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून, तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत नैॡत्येकडून राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १६ किमी, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ताशी वेग १२ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २९ अंश अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के राहील.

मराठवाडा

मराठवाड्यात आज व उद्या (ता. २२,२३) पावसाचे प्रमाण मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५ मिमी, जालना जिल्ह्यात ६ ते १४ मिमी, हिंगोली जिल्ह्यात ११ ते १३ मिमी, परभणी जिल्ह्यात १३ ते १७ मिमी, बीड जिल्ह्यात ६ ते १४ मिमी, नांदेड जिल्ह्यात १५ ते २१ मिमी, लातूर जिल्ह्यात १६ ते २० मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात १६ ते २१ मिमी प्रतिदिनी इतक्या पावसाची शक्यता राहील. पावसाचा जोर सर्वच जिल्ह्यांत चांगला राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांत ताशी १६ ते १७ किमी राहील. परभणी जिल्ह्यात ताशी १४ किमी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी १३ किमी, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ताशी ११ किमी राहील. कमाल तापमान धाराशिव, लातूर, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर जालना जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. तसेच हिंगोली व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर लातूर, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७६ टक्के सर्वच जिल्ह्यात राहील.

पश्चिम विदर्भ

आज व उद्या (ता. २२,२३) बुलडाणा जिल्ह्यात २ ते ४ मिमी, अकोला व अमरावती जिल्ह्यांत २ ते ५ मिमी व वाशीम जिल्ह्यात २ ते १२ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा वेग अकोला व अमरावती जिल्ह्यांत ताशी १३ किमी, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ताशी १४ किमी राहील. कमाल तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ ते ९७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७० टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज व उद्या (ता. २२,२३) वर्धा व नागपूर जिल्ह्यात ६ ते ९ मिमी, तर यवतमाळ जिल्ह्यात १९ मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस , तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज व उद्या (ता. २२,२३) गोंदिया जिल्ह्यात ५ ते ७ मिमी, भंडारा जिल्ह्यात ४ ते ७ मिमी, चंद्रपूर जिल्ह्यात ११ ते १४ मिमी व गडचिरोली जिल्ह्यात १२ ते १४ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा गोंदिया जिल्ह्यात वायव्येकडून, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अत्यंत कमी २ ते ३ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ ते ९८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६१ टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र

आज व उद्या (ता. २२,२३) पुणे व नगर जिल्ह्यांत ५ मिमी, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ३ ते ७ मिमी, सोलापूर जिल्ह्यात ५ ते १३ मिमी, कोल्हापूर जिल्ह्यात २ ते ३ मिमी प्रतिदिन पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यांत वायव्येकडून, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ताशी १५ ते १६ किमी, तर कोल्हापूर, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत ताशी १० ते १३ किमी राहील. कमाल तापमान पुणे व नगर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर पुणे व नगर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस व सोलापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ७७ टक्के राहील.

कृषी सल्ला

रब्बी ज्वारीची पेरणी जमिनीत पुरेशी ओल असताना करावी.

भात खाचरात १० सेंमी पाणीपातळी ठेवावी.

सोयाबीनची काढणी व मळणी पावसात उघडीप असताना करावी.

खरिपातील उभ्या पिकातील तणे उपटून घ्यावीत.

हळद व आले पिकात गड्डाकूज दिसून येताच त्वरित उपाय करावेत.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Rate: केळी दर निश्‍चिती बाबतप्रशासनाची चालढकल

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा ‘जीआर’ मागे घेणार नाही : विखे पाटील

Gokul Dairy Products: ‘गोकुळ’ आइस्क्रीम, बटर बाजारात आणणार

Government Decision: कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉपच देणार

Agricultural Damage: पंजाबमध्ये १.८४ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT