Pune News : जुलैपाठेपाठ ऑगस्ट महिन्यातही राज्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. मॉन्सून २०२४च्या हंगामात राज्यात ऑगस्ट अखेर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राज्यात १०२७.२ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या २६ टक्के अधिक पाऊसमान झाले आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असून, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने सरासरी पार केली आहे. फक्त ऑगस्ट महिन्याचा विचार करता राज्यात २८६.५ मिलिमीटर म्हणजेच १०२ टक्के पाऊस झाला आहे.
जून महिन्यात मृग नक्षत्र कोसळल्याने राज्यात पावसाने सरासरी गाठली होती. यातच २११.३ मिलिमीटर (१ टक्के अधिक) पाऊस झाला असला तरी पावसाचे वितरण असमान होते. त्यापाठोपाठ जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पावसाने समाधानकारक हजेरी लावली.
फक्त जुलैमध्ये राज्यात तब्बल ५२९.५ मिलिमीटर (तब्बल ६३ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली. त्यामुळे जुलै अखेर (१ जून ते ३१ जुलै) राज्यात सरासरी ७४०.८ मिलिमीटर म्हणजेच ३९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती.
ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर अखेरच्या टप्प्यात पावसाने जोर धरल्याने पावसाने कशीबशी सरासरी गाठली. ऑगस्टमध्ये मध्य महाराष्ट्र वगळता राज्याच्या बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी होते.
उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस अत्यल्प होता. कोकण, मराठवाड्यात पावसाने कशीबशी सरासरी गाठली. तर विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे दिसून आले.
केवळ ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरी २८०.८ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा १ ते ३१ऑगस्ट या कालावधीत २८६.५ (२ टक्के अधिक) पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले.
ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊस
विभाग---सरासरी---पडलेला---टक्केवारी
कोकण-गोवा---२४९६.७---३२०३.६---अधिक २८
मध्य महाराष्ट्र---५८८.४---८७२.५---अधिक ४८
मराठवाडा---४८१.९---५४०.५---अधिक १२
विदर्भ---७८१.८---८९३.३---अधिक १४
नगर जिल्ह्यात सर्वाधिक, हिंगोलीत सर्वात कमी पाऊस
यंदा राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असली तरी पावसाचे प्रमाण असमान असल्याचे दिसून आले आहे. कमी काळात झालेल्या मोठ्या पावसामुळे सरासरीची स्थिती सुधारली. मात्र भूजलाची पातळी वाढण्यासाठी भीज पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.
ऑगस्ट अखेर नगर जिल्ह्यात सर्वाधिक (७६ टक्के अधिक) पाऊस झाला. त्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात (७३ टक्के अधिक) दमदार पाऊस झाला आहे. उलट हिंगोली जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असून, तेथे पावसात ५० टक्क्यांची तूट दिसून आली आहे.
राज्यात जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण (तफावत टक्क्यांत) :
सरासरीपेक्षा खूप अधिक (६० टक्क्यांपेक्षा अधिक) : नगर, सांगली.
सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) : पालघर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर. बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.
सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) : मुंबई शहर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया.
सरासरीपेक्षा कमी (उणे ५९ ते उणे २० टक्के) : हिंगोली.
ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती, सरासरीच्या तुलनेत तफावत : जिल्हा---सरासरी---पडलेला---तफावत (टक्के)
मुंबई शहर---१७५८.५---२०२८.९---अधिक १५
मुंबई उपनगर---१९५९.२---२४३२.१---अधिक २४
पालघर---१९३८.३---२३३०.४---अधिक २५
रायगड---२६८९.७---३२८१.८---अधिक २२
रत्नागिरी---२७८३.४---३४९०.२---अधिक २५
सिंधुदुर्ग---२६०६.७---३६७६.४---अधिक ४१
ठाणे---२०८७.१---२२७२.५---अधिक ९
नगर---३०८.७---५४४.१---अधिक ७६
धुळे---४२८.३---६२६.६---अधिक ४६
जळगाव---४९९.०---७२९.७---अधिक ४६
कोल्हापूर---१५००.९---२१७३.९---अधिक ४५
नंदूरबार---६९१.३---८९०.८---अधिक २९
नाशिक---७१५.७---१०६९.०---अधिक ४९
पुणे---७६४.८---१२०७.६---अधिक ५८
सांगली---३५२.८---६११.९---अधिक ७३
सातारा---६८७.०---८५४.१---अधिक २४
सोलापूर---२९२.४---४०८.०---अधिक ४०
बीड---३९१.६---५२२.९---अधिक ३४
छ. संभाजीनगर---४१३.६---४७६.४---अधिक १५
धाराशिव---४००.४---५३३.९---अधिक ३३
हिंगोली---६१६.१---३१०.८---उणे ५०
जालना---४५०.६---५०३.०---अधिक १२
लातूर---४९०.३---६८७.०---अधिक ४०
नांदेड---६२२.०---६२३.२--- ०
परभणी---५३६.३--५९३.९---अधिक ११
अकोला---५७८.३---६३१.४----अधिक ९
अमरावती---६७८.९---६५५.५---उणे ३
भंडारा---९११.६---९३९.९---अधिक ३
बुलडाणा---५२४.३---६३०.३---अधिक २०
चंद्रपूर---९०५.३---१०६६.५---अधिक १८
गडचिरोली---१०८८.०---१३५५.८---अधिक २५
गोंदिया---१०३२.८---९३५.२---उणे ९
नागपूर---७७७.६---८३३.५---अधिक ७
वर्धा---६९०.८---९१३.०---अधिक ३२
वाशीम---६३२.६---६९८.०---अधिक १०
यवतमाळ---६७६.६---८४०.२---अधिक २४
नकाशासाठी...
भडक निळा रंग : ६० टक्क्यांपेक्षा अधिक
निळा रंग : अधिक २० ते अधिक ५९ टक्के पाऊस
हिरवा रंग : उणे १९ ते अधिक १९ टक्के
लाल रंग : उणे २० ते उणे ५९ टक्के
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.