Maharashtra Rain : विजांसह पावसाची शक्यता

Rain Update : आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेले काही दिवस उघडीप देणाऱ्या पावसाला पोषक हवामान होत आहे. यातच राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, कोटा, सिधी, रांची, दिघा ते पूर्व - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होते.

Rain
Maharashtra Rain : पावसाला पोषक हवामान

पावसाच्या दडीने कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे. गुरुवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेले आहे. ढगाळ हवामानामुळे उकाड्याने घामटा निघत आहे.

Rain
Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आकाश ढगाळ झाले आहे. आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भासह उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह पावसाची शक्यता : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com