Monsoon Update  Agrowon
हवामान

Retreating Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीला सुरुवात

Rain Update : दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा प्रवास पुन्हा सुरू करत मोठी माघार घेतली आहे. शनिवारी (ता. ५) महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागांतून माघार घेतली आहे. दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) २३ सप्टेंबर रोजी वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला. २४ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियानाच्या काही भागातून मॉन्सून परतल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थबकली. २ ऑक्टोबर रोजी तब्बल आठ दिवसांनी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे.

शनिवारी (ता. ५) मॉन्सूनने उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागांसह, उत्तर महाराष्ट्र आणि अरबी समुद्राच्या आणखी काही भागातून मुक्काम हलविला आहे.

सुलतानपूर, पन्ना, नर्मदापुरम, खारगाव, नंदुरबार, नवसारीपर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सूनच्या परतीस पोषक हवामान झाल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश, गुजरातच्या उर्वरित भागासह, महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT