Winter Weather Agrowon
हवामान

Weather Maharashtra : राज्यातील गारठा वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Forecast : मागील चार दिवस राज्यात पावसाला पोषक हवामान आता निवळलं आहे. त्यामुळे आकाश निरभ्र झालं आहे.

Dhananjay Sanap

Pune News : मागील चार दिवस राज्यात पावसाला पोषक हवामान आता निवळलं आहे. त्यामुळे आकाश निरभ्र झालं आहे. परिणामी राज्यातील किमान तापमानात घट होण्याचे चिन्हं दिसू लागली आहेत. राज्याचा किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. त्यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर मागील चोवीस तासात जेऊर येथे नीचांकी १२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

तर देशात दिल्लीमध्ये नीचांकी १०.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तसेच पुढील पाच दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये किमान तापमानाचा पारा २ ते ४ अंश सेल्सियसनं घसरण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

मालदिव आणि लगतच्या विषुववृत्तीय हिंदी महासागरात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्र सपाटीपासून ०.९ किमीवर चिन्हांकित झाली. पुढील पाच दिवस राज्यातील विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात निरभ्र आकाश राहील. तर किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. 

मॉन्सून परतीचा प्रवास लांबल्याने खरीप पिकांना फटका बसला. तसेच अनेक भागात रब्बीच्या पेरणीसाठी वाफसा स्थिती नव्हती. परंतु मॉन्सून चांगला बरसल्याने सिंचन स्त्रोत भरलेली आहेत. आता रब्बी पेरणीला पोषक हवामान झाल्याने राज्यातील रब्बी पेरणी वेग घेतला आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT