Rain Alert Agrowon
हवामान

Rain Forecast : राज्यात सर्वदूर विजांसह पावसाचा हवामान विभागाचा इशारा

Rain Alert : आज (ता. २१) राज्यात सर्वदूर विजांसह पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. वळीव स्वरूपाच्या पावसाने काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. आज (ता. २१) राज्यात सर्वदूर विजांसह पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मध्य बांगलादेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याचे संकेत आहे. यातच मॉन्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगरपासून, रोहतक, ओराई, चुर्क, मालदा, ते कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे.

उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश परिसरावर १.५ किलोमीटर उंचीवर, तसेच अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून मालदीवपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जेऊर येथे उच्चांकी ३६.५ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात वळीव स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने दणका दिला.

आज (ता. २१) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT