Rain Update : ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाची तूट

Rain News : यंदा जून व जुलै महिन्यात सरासरीचा टप्पा ओलांडला. परंतु ऑगस्ट महिन्यात आजवर पाऊस कमी झाल्यामुळे तूट आली आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर ओसरला असून पहिल्या पंधरवाड्यात गुरुवारपर्यंत (ता. १५) परभणी जिल्ह्यात सरासरी ११०.२ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५३.३ मिमी (४८.४ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ११६.७ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५५.३ मिमी (४७.४ टक्के) पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्यात ५६.९ मिमी तर हिंगोली जिल्ह्यात ६१.४ मिमी पावसाची तूट झाली आहे.

परभणी जिल्ह्यात ऑगस्टमध्ये गुरुवारपर्यंत (ता. १५) अपेक्षित सरासरीपेक्षा जास्त पाऊस पेठशिवणी १११६.६ मिमी (११९.६ टक्के), रावराजूर १११.५ मिमी (११२.९ टक्के), महातपुरी १०६ मिमी (१०७ टक्के) झाला असून उर्वरित ४९ मंडलांमध्ये १५.२ मिमी (१२.७ टक्के) ते ९१.६ मिमी (९२.२ टक्के) पाऊस झाला आहे. जाम मंडलांत सर्वांत कमी १५.२ मिमी पाऊस झाला. यंदा जून व जुलै महिन्यात सरासरीचा टप्पा ओलांडला.

Rain Update
Rain Update : तीनही जिल्ह्यांत पावसात जोर नाहीच

परंतु ऑगस्ट महिन्यात आजवर पाऊस कमी झाल्यामुळे तूट आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून गुरुवारपर्यंत (ता. १५) ४७४ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४५८.९ मिमी (९६.७ टक्के) पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात ऑगस्टमध्ये गुरुवारपर्यंत (ता. १५) सर्व ३० मंडलांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

Rain Update
Rain In Maharashtra : पाऊस झाडांना घाबरत असेल का ?

सर्वांत कमी टेंभुर्णी मंडलांत २९.९ मिमी (२८.४ टक्के) तर आंबा मंडलांत सर्वाधिक ९५.५ मिमी (९०.९ टक्के) पाऊस झाला. यंदा जूनमधील तूट जुलैमध्ये भरून निघाली. परंतु ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ५१६.१ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४८०.९ मिमी (९३.२ टक्के) पाऊस झाला आहे.

परभणी, हिंगोली जिल्हा १५ ऑगस्टपर्यंतची पाऊस स्थिती (मिमीमध्ये)

तालुका सरासरी पाऊस प्रत्यक्षातील पाऊ टक्केवारी

परभणी ११९.६ ३७.४ ३१.३

जिंतूर १०८.१ ५५.५ ५१.३

सेलू १२२.९ ६१.० ४९.६

मानवत ११७.८ ३६.० ३०.६

पाथरी १०२.९ ३९.४ ३८.३

सोनपेठ ९९.० ४७.४ ४७.९

गंगाखेड ९९.४ ७४.० ७४.४

पालम ९८.८ ८६.४ ८७.४

पूर्णा .१११.१ .४७.९ ४३.१

हिंगोली १२९.३ ४७.७ ३६.९

कळमनुरी १२०..४ ५९.४ ४९.३

वसमत १०५.१ ५४.९ ५२.२

औंढा नागनाथ १०६.७ ५१.६ ४८.४

सेनगाव १०३.१ ६३.२ ६१.३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com