Rain Update : मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार

Rain News : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे ११५ मिलिमीटर, तर वडगावशेरी येथे ११३.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

ओढ्या, नाल्याच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली होती. सोमवारी दुपारनंतर पुणे, नागपूर, परभणी जिल्ह्यात हलका तर अकोला, सिंधुदुर्ग, नाशिक जिल्ह्यांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

राज्यात तब्बल १५ ते १६ दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. हा पाऊस काढणीच्या अवस्थेत असलेल्या मूग आणि सोयाबीन पिकांना नुकसानकारक ठरत असल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. तर कापूस, तूर, बाजरी, भात या पिकांना दिलासा देणारा ठरत असून ऊस लागवडीसाठी योग्य असल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Rain Update
Rain Update : ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाची तूट

घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण कमी असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. तर खानदेशातील धुळे जिल्ह्यातील म्हसदी येथे ३९ मिलिमीटर, कासारे येथे ३१ मिलिमीटर, जळगावमधील फैजपूर येथे ३४ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे कापूस पिकांना आधार मिळाला आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत अनेक भागात जोरदार पाऊस पडला.

तर नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला असून श्रीगोंदा येथे ९१ मिलिमीटर, कोळगाव येथे ८० मिलिमीटर पाऊस पडल्याने पिकांना चांगलीच तरारी आली आहे. नाशिकमधील वाडीवऱ्हे येथे ८७ मिलिमीटर, सोलापूरमधील नाझरा येथे ८० मिलिमीटर, साताऱ्यातील होळ येथे ५१ मिलिमीटर, सांगलीतील खरसुंडी येथे ५१ मिलिमीटर, आटपाडी येथे ४५ मिलिमीटर, कोल्हापुरातील हेर्ले येथे ४८, कबनूर, इचलकरंजी येथे ३१ मिलिमीटर पाऊस पडला.

मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. यामध्ये देवगाव रंगारी येथे ८६ मिलिमीटर पाऊस झाला असून छत्रपती संभाजीनगर येथे ३९, लोहगाव ३२, शिवूर, बोरसर ६६, जानेफळ ३५, वाडोदबाजार येथे ३२ मिलिमीटर पाऊस पडला.

जालना जिल्ह्यातील पिंपळगाव येथे ४० मिलिमीटर, बीडमधील मांजरसुभा येथे ३६ मिलिमीटर, तर पाटोदा ३६, थेरळा ५८, धोंडराई ३८, उमापूर येथे ३३ मिलिमीटर, लातूरमधील अहमदपूर ४१, निटूर ३४, बोरोळ ६४, साकोळ येथे ३८ मिलिमीटर, नांदेडमधील जांब येथे ४३ मिलिमीटर, माळाकोळी ३१, कळंबबर येथे ३५ मिलिमीटर पाऊस पडला.

Rain Update
Monsoon Rain : पहिल्याच पावसात २१ तलाव फुटले

उर्वरित भागात ढगाळ वातावरण होते. तर अधूनमधून शिडकावा होत होता. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील नरवेल येथे ५८ मिलिमीटर पाऊस पडला. तर अंजनी येथे ३४ मिलिमीटर, अकोला जिल्ह्यातील पणज येथे ५१ मिलिमीटर, अकोलखेड येथे ३६ मिलिमीटर, वाशीममधील राजगाव येथे ३१ मिलिमीटर, आसेगाव येथे ३५ मिलिमीटर, अमरावतीतील साटेफळा येथे ६२ मिलिमीटर, तर मोर्शी ३२, अंजनगाव ३७, भांडरज येथे ५१ मिलिमीटर, यवतमाळमधील दारव्हा येथे ४४ मिलिमीटर, वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे ३३ मिलिमीटर पाऊस पडला.

कोकणात जोरदार पाऊस नसला तरी काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. ठाणे जिल्ह्यातील धसइ येथे ४९ मिलिमीटर, नयाहडी ४०, सरळगाव येथे ३९ मिलिमीटर, रायगडमधील बिरवडी येथे ३६ मिलिमीटर, नेरळ २९ मिलिमीटर, रत्नागिरीतील शिरगांव येथे ४३ मिलिमीटर, कळकवणे येथे ३३ मिलिमीटर, पालघरमधील मोखडा येथे ५८ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला आहे.

सोमवारी (ता.१९) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत ः कृषी विभाग)

मध्य महाराष्ट्र : बागलाण ४२, नांदगाव ६५, बनगाव ३८, नायडोगरी ३१, घोटी ३३, धारगाव ३७, डूबेरे ४४, आंगणगाव ३२, केडगाव ६४, चास ६९, रुईछत्तीसी ३२, भाळवणी ४९, टाकळी ४६, काष्टी ७२, मांडवगण ७१, बेलवंडी ४०, चिंभळा ३४, देवदैठण ३९, शेवगाव, भातकुडगाव ३०, कुकाणा ३०, साकीरवाडी, राजूर, कोतूळ, ब्राह्मणवाडा ३२, केशवनगर ३३, खडकवासला ३३, कळस ३०, वेल्हा ३६, घोडेगाव ४६, मंचर ३१, मलठण ३६, पणदरे ५९, वडगाव ४७, सुपा ६९, मोरगाव ७७, उंडवडी ८६, कुंभारवळण ४१, मंद्रूप ३६, भाळवणी ३५, सांगोला ५१, मरवडे ३१, बुध ४०, कुक्‍कुडवाड ४४, वाठार-नि ३३, बरड ४५, राजाळे ३९, पसरणी ३५, ओझर्डे ३०, पाचगणी ३५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com