Rain News  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

Latest Rain Forecast : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मॉन्सून कमजोर झाला आहे. अनेक भागात पावसाने खंड पडला असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.

Team Agrowon

Weather Update Pune : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मॉन्सून कमजोर झाला आहे. अनेक भागात पावसाने खंड पडला असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. ५) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे.

तर उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात तुरळक सरींसह मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यालगत समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाब पट्ट्याचे पश्चिमेकडील टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असून, दोन दिवसांत पूर्व टोक देखील उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस पंजाबच्या अमृतसर पासून कर्नाल, दिल्ली, हमीरपूर कमी दाबाचे केंद्र, रांची, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे.

राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली असून, ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळात हलक्या सरी पडत आहेत. आज (ता. ५) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीप सह, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू बाजारात चढ-उतार, झेंडू बाजारात तेजीत, टोमॅटो बाजारात चढ-उतार , केळी बाजारात तेजी, डाळिंब आवकेत घट

Lift Irrigation : उपसा सिंचनच्या पाणीवापरासाठीचे दर निश्चित

Manoj Jarange Patil Protest: मी मुंबईला एकटाच निघणार, योग्यवेळी तुम्हाला बोलवेन; मनोज जरांगेंचा निर्णय

Water Crisis Management : संभाव्य टंचाईसाठी काटेकोर तयारी करा

Rain Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुढील ५ दिवसांचा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT