Monsoon Rain : यंदाचा जुलै विक्रमी पावसाचा

Monsoon Season 2023 : जून महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्याने २३ जूनपासून पावसाला सुरुवात झाली, परंतु जुलै महिन्यामध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Mahad News : काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले असून, जुलै महिन्यात झालेल्या विक्रमी पावसाने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली तर काही ठिकाणी दरडी कोसळल्याने जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. महाडमध्ये मंगळवारी पुन्हा पूरसदृश स्थिती निर्माण झाल्‍याने नागरिकांची धाकधूक वाढली आहे.

जून महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्याने २३ जूनपासून पावसाला सुरुवात झाली, परंतु जुलै महिन्यामध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी ४५९ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

तर जुलै महिन्यामध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या तब्बल १४९ टक्के पाऊस पडल्याने जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका अंबा, काळ, गांधारी, पाताळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.

परिणामी नागोठणे, रोहा, पोलादपूर, महाड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. जुलै महिन्यामध्ये आतापर्यंत सरासरी १४५८ मिलिमीटर पाऊस पडला असून केवळ दहा दिवसांत १ हजार मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Monsoon Rain
Konkan Rain : कोकणात मुसळधार पाऊस सुरूच

मुसळधार पावसामुळे इर्शाळवाडीत दरड कोसळून शेकडो लोक गाडले गेले तर महाड, पोलादपूर, पाली, माथेरान या परिसरातही दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सद्यःस्थितीत प्रत्‍येक तालुक्‍यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

Monsoon Rain
Monsoon Rain Update : कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

गावागावांत अधिकारी नियुक्‍त

पावसाचा जोर वाढत असून घरांची पडझड, गोठ्यांचे नुकसान, झाडे उन्मळून पडल्‍याच्या घटना वाढल्‍या आहेत. इर्शाळवाडीतील दरड दुर्घटनेनंतर सर्वच तालुक्‍यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतरित होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून गावागावांमध्ये त्‍यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पालकत्‍व देण्यात आले आहे.

आतापर्यंत पाऊस

१९१७ मिमी

जुलै महिन्यात झालेला पाऊस

१४५८ मिमी

चार दिवस शाळा बंद

अतिवृष्‍टीमुळे जिल्ह्यात यंदा प्रथमच सलग तीन ते चार दिवस शाळा बंद करण्यात आल्या होत्या. पावसाने शेतीबरोबरच अनेक रस्ते व पूल उद्‌ध्वस्त केले आहेत. वरंध, आंबेनळी घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. जुलै महिन्यात झालेल्या विक्रमी पावसाने अनेक तालुक्‍यातील जनजीवन विस्कळित केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com