Maharashtra Weather : महाराष्ट्रावरील हवेचे दाब बुधवार (ता.१३) पर्यंत १०१२ हेप्टापास्कल इतके राहतील. त्यामुळे सकाळी सौम्य थंडी व दुपारी उष्ण हवामान राहील. मात्र गुरुवार (ता. १४)पासून राज्यातील बहुतांशी भागांमध्ये कमाल तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने, तर किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्ण हवामानाची तीव्रता आणखी वाढेल. महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१० हेप्टापास्कलपर्यंत कमी होतील. त्याचा परिणाम सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेवर दिसून येईल.
सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन हवामान उष्ण व कोरडे राहील. मराठवाडा, विदर्भ, तसेच पश्चिम महाराष्ट्रात दुपारच्या वेळी उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगाव, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत हवामान अल्प प्रमाणात अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील.
या आठवड्यात बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होईल. त्यामुळे पिकांची, जनावरांची तसेच कुक्कुट पक्ष्यांची पाण्याची गरज वाढेल. त्या अनुषंगाने योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रशांत महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान बऱ्याच भागांत २५ ते २६ अंश सेल्सिअस, तर काही भागांत २८ ते २९ अंश सेल्सिअस आणि अल्पशा भागात ते ३० अंश सेल्सिअस राहील.
त्यावरून ‘एल निनो’चा प्रभाव संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे. हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. तसेच अरबी समुद्राचे व बंगालच्या उपसागराचे तापमानही २९ अंश सेल्सिअस इतके असल्याने मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता वाढते आहे.
कोकण :
कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तर रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पालघर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४३ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १७ टक्के इतकी कमी राहील. त्याचा आंबा मोहराच्या फलधारणेवर परिणाम होईल. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी ६ ते ८ किमी इतका कमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र :
कमाल तापमान जळगाव जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नंदुरबार जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत २२ ते २५ टक्के, तर धुळे व जळगाव जिल्ह्यात १८ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मराठवाडा :
परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान परभणी जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर आणि जालना जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर धाराशिव व बीड जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव व परभणी जिल्ह्यांत २७ टक्के, तर लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १७ ते १९ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वायव्येकडून, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ :
कमाल तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस आणि वाशीम जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता वाशीम जिल्ह्यात ३६ टक्के, तर बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत फक्त १८ ते १९ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १० टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याची दिशा बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत वायव्येकडून, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ कि.मी. राहील.
मध्य विदर्भ :
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १० ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
मध्य विदर्भ :
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १० ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
पूर्व विदर्भ :
कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस आणि भंडारा जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.
सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २० ते २३ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किमी इतका कमी राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र :
कमाल तापमान पुणे जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअसपर्यंत, तर कोल्हापूर, सातारा व नगर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. कमाल तापमान सांगली जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील.
सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २१ ते २७ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १० ते १२ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
कृषी सल्ला :
उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेऊन फळबागांमध्ये आतापासूनच पूर्वनियोजन करून कामांस सुरुवात करावी. त्यासाठी फळबागांमध्ये आच्छादन, ठिबक सिंचन प्रणालींची देखभाल, केओलीन द्रावणाची झाडावर फवारणी इत्यादी कामे करून घ्यावीत.
पालेभाज्या उत्पादनासाठी ग्रीनहाउस, शेडनेट तंत्राचा वापर करावा.
तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने जनावरांना सावलीत बांधावे. जागेवरच थंड आणि मुबलक पाणी उपलब्ध करावे.
उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे योग्य नियोजन करावे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.