Agriculture Weather : महाराष्ट्रावर आज व उद्या (ता.२५ व २६) हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका कमी राहिल. तर मंगळवार (ता. २७) पासून पुन्हा हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतका राहिल. त्यामुळे सुरुवातीला तापमानात वाढ व नंतर तापमान कमी होणे शक्य आहे.
तापमानात वाढ होताच हवेचे दाब कमी होतात. तापमानात घट होताच पुन्हा हवेचे दाब वाढतात. याचा थेट परिणाम हवामानावर होतो. परभणी, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहणे शक्य आहे.
जळगाव, परभणी, हिंगोली, जालना, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, सोलापूर या जिल्ह्यांत भारतीय हवामान शास्त्र विभागाने अल्पशा पावसाची शक्यता वर्तवली आहे.वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांतही पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती तसेच यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील धाराशिव व लातूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १७ कि.मी.पर्यंत राहण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. वाऱ्याच्या दिशेतही बदल होतील. पश्चिम विदर्भात दुपारी उष्णता अधिक प्रमाणात जाणवेल. तशीच स्थिती मराठवाड्यातही जाणवेल.
कोकण
कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. हे तापमान उन्हाळी भुईमूग, भात व वाल तसेच कलिंगड या पिकांसाठी अत्यंत चांगले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये आकाश पूर्णतः निरभ्र राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५१ ते ५२ टक्के, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३१ ते ३२ टक्के आणि पालघर जिल्ह्यात २० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात २४ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत १८ ते १९ टक्के इतकी कमी राहील.
त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ताशी ८ कि.मी. इतका राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत नैॡत्येकडून, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस आणि नंदुरबार जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील.
आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ३१ टक्के, तर नंदुरबार, नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत २० ते २७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १० ते १३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.
मराठवाडा
३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तसेच धाराशिव, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. दुपारी हवामान उष्ण व कोरडे राहील. किमान तापमान धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर जालना व हिंगोली जिल्ह्यांत १५ ते १६ अंश सेल्सिअस इतके कमी राहील.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, तर बीड व परभणी जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ, तर उर्वरित जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, लातूर, परभणी व जालना जिल्ह्यांत ५० ते ५८ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड व बीड व हिंगोली जिल्ह्यांत ४० ते ४६ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता धाराशिव जिल्ह्यात ३३ टक्के, लातूर, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत २० ते २७ टक्के आणि हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १२ ते १६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस तर वाशीम जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ३८ टक्के, बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ५१ टक्के व वाशीम जिल्ह्यात ६४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते ३० टक्के राहील. वाशीम जिल्ह्यात ६.३ मि.मी. व बुलडाणा जिल्ह्यात ०.६ मि.मी. इतक्या अल्प पावसाची शक्यता राहील.
मध्य विदर्भ
नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस व यवतमाळ जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील.
आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १५ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. यवतमाळ जिल्ह्यात ७.१ मि.मी., वर्धा जिल्ह्यात २.६ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात १.३ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ६८ ते ७१ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३१ ते ३३ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३० ते ३३ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. चंद्रपूर जिल्ह्यात ४.५ मि.मी., भंडारा जिल्ह्यात २.२ मि.मी., गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत १ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
कमाल तापमान कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ५८ टक्के, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३० ते ३९ टक्के, तर पुणे व नगर जिल्ह्यांत २२ ते २५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १३ ते २० टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ कि.मी. राहील. सोलापूर जिल्ह्यात अत्यल्प पावसाची शक्यता आहे.
कृषी सल्ला
उन्हाळी भुईमूग पिकास ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
हरभरा पिकास फुलोरा येताना व घाटे भरताना पाणी द्यावे.
फळपिकांना व फळभाज्यांना शक्यतो ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.
उन्हाळी हंगामातील भाजीपाला व पालेभाज्यांची लागवड ५० टक्के शेडनेटमध्ये करावी.
फळबागांमध्ये गवताचे किंवा पाचटाचे आच्छादन करावे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.