Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold: पुढील पाच दिवस हवामान कसे राहणार? राज्यातील काही भागात किमान तापमानात वाढ

Weather News : उत्तर भारतातील अनेक भागात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला. राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे.

Anil Jadhao 

Weather Update : पुणेः उत्तर भारतातील अनेक भागात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला. राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. तसेच पुढील पुढील काही दिवस तापमानातील चढ उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.

तर पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी जास्त होत आहे. कालपासून अनेक भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली. आज राजस्थानमधील सिकार येथे ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे निचांकी तापमान ठरले.

तर पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंडमध्ये अनेक भागात किमान तापमान ८ अंश सेल्सिअस ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 

उत्तरेकडून महाराष्ट्राकडे येणारे थंड वारे काहीसे कमी झाले. त्यामुळे राज्यात गारठा कमी झाला आहे. राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर उर्वरित राज्यात तापमानाचा पारा १० अंशांच्या वरच आहे. पुढील काळात राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis On Ajit Pawar: 'मित्रशोक आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो', अजितदादांच्या आठवणींनी मुख्यमंत्री फडणवीस भावूक

Agriculture Advisory: ढगाळ हवामान; किमान, कमाल तापमानात वाढ शक्य

Carbon Farming: कार्बन शेती : शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग

Sugarcane Workers: मजुरांचे तांडे परतीच्या वाटेवर; शिवार पुन्हा गजबजणार

Maharashtra Unseasonal Rain: विदर्भ, मराठवाडा, कोकणला अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान

SCROLL FOR NEXT