Maharashtra Weather
Maharashtra WeatherAgrowon

Maharashtra Rain : राज्यातील हवामान पुढील ५ दिवस कसे असेल ? केरळ आणि तमिळनाडूत काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

Weather Update : राज्यातील तापमान पुढील पाच दिवस कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर केरळ आणि तमिळनाडूत काही भागात पावसाचा अंदाज आहे.
Published on

Pune News : उत्तर भारतात थंडी कायम आहे. पण राज्यातील सरासरी तापमान काहीसे अधिक दिसते. तर राज्यातील तापमान पुढील पाच दिवस कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर केरळ आणि तमिळनाडूत काही भागात पावसाचा अंदाज आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात पाऊस पडल्यानंतर मागील काही दिवसांपासून वातावरण कोरडे आहे. तापमानात काहीसे चढ उतार होत असले तरी थंडीचा कडाका असून जाणवत नाही.

Maharashtra Weather
Weather News : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच

सरासरी तापमान अद्यापही जास्तच असल्याचे हवामानाच्या नोंदीवरून स्पष्ट होते. राज्यातील बहुतांशी भागात सकाळी काहीशी थंडी जाणवत आहे. पण कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते. पुढील पाचही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Maharashtra Weather
Maharashtra Rain : थंडीसाठी आणखी वाट पाहावी लागणार ? उत्तर भारतात किमान तापमानात घट

उत्तर भारतात मागील काही दिवसांपासून किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. किमान तापमान ५ अंंश सेल्सिअस ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात हे तापमान दिसत आहे.

नैऋत्य अरबी समुद्र आणि शेजारच्या भागात चक्राकार व्याऱ्याची स्थिती निर्णाण झाली आहे. तर तमिळनाडू आणि केरळच्या काही भागात १६ आणि १७ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com