Weather Update  Agrowon
हवामान

Weather Forecast : मुंबईसह कोकणात उन्हाचा चटका

Latest Weather Update : ऑक्टोबर हीट तडाखा कायम असल्याने मुंबईसह कोकणात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.

अमोल कुटे

Pune Weather News : ऑक्टोबर हीट तडाखा कायम असल्याने मुंबईसह कोकणात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. आज (ता. २३) राज्यात ढगाळ व कोरड्या हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) दाखल झाला असताना राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्रामुळे पूर्व किनारपट्टीवर ढगांची गर्दी झाली आहे. शनिवारी (ता. २१) राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ढगाळ हवामानामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान काहीसे कमी झाले आहे. तर रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईतील सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. डहाणू येथे तापमान ३६ अंशांवर होते. आज राज्यात कोरड्या हवामानसह, तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.९, कोल्हापूर ३२.९, महाबळेश्वर २६.३, नाशिक ३१.०, सांगली ३३.०, सातारा ३१.७, सोलापूर ३५.८, सांताक्रूझ ३७.४, डहाणू ३६.०, रत्नागिरी ३५.१, छत्रपती संभाजीनगर ३२.६, परभणी ३३.७, अकोला ३५.२, अमरावती ३३.६, बुलडाणा ३३.०, ब्रह्मपूरी ३५.३, चंद्रपूर ३३.०, गडचिरोली ३२.६, गोंदिया ३३.२, नागपूर ३३.३, वर्धा ३१.०, वाशीम ३४.०, यवतमाळ ३४.०.

'तेज' चक्रीवादळ झाले अतितीव्र

अरबी समुद्रामधील 'तेज' चक्रीवादळ रविवारी (ता. २२) अतितीव्र झाले आहे. हे चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर येमेन आणि ओमानकडे सकरत असून, उद्यापर्यंत (ता. २४)येमेनच्या अल घाईदाह जवळ किनारपट्टीला धडकण्याचे संकेत आहेत.

तर बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढत असून, वायव्येकडे सरकणारी ही वादळी प्रणाली दिशा बदलून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश सरकण्याची शक्यता आहे.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

सांताक्रूझ ३७.४, डहाणू ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT