महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज (ता. २२) ते गुरुवार (ता. २६) पर्यंत १०१२ हेप्टापास्कल इतके अधिक राहतील. शुक्रवार व शनिवारी (ता.२७, २८) हवेचे दाब कमी होऊन ते १०१० हेप्टापास्कल इतका राहतील. आज (ता. २२)पासून मंगळवार (ता. २४) या कालावधीत बंगालच्या उपसागरात लहानशा चक्रीय वादळाची निर्मिती होईल. हे वादळ बांगलादेश व पश्चिम बंगालचे दिशेने जाईल. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वसाधारणच राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. हवामान कोरडे राहील. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण तसेच मराठवाड्यातील जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान उष्ण व कोरडे राहील. त्यामुळे बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होईल. त्यामुळे पिकांची, जनावरांची, कुक्कुटपक्ष्यांची पाण्याची गरज वाढेल.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तर हिंदी महासागर व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. त्यामुळे ‘एल निनो’चा प्रभाव वाढेल. त्याचा परिणाम पाऊस तसेच तापमानावरही दिसून होईल. हिवाळ्यातील थंडीच्या प्रमाणावर त्याचा परिणाम जाणविण्याची शक्यता आहे.
कोकण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी राहील. कमाल तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्दता ५० ते ५८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्दता ३१ ते ३२ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे उष्ण हवामान जाणवेल. बाष्पीभवानाचा वेग वाढेल. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर नंदुरबार जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्दता ४५ ते ४९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्दता २५ ते २८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
मराठवाडा
धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव जिल्ह्यात ताशी १५ किमी, लातूर व बीड जिल्ह्यांत ताशी १२ किमी, तर परभणी हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी १० किमी राहील. पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. मात्र नांदेड जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्दता ५४ ते ६१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३३ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. मात्र अकोला व वाशीम जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ५९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २९ ते ३१ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील.
मध्य विदर्भ
यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. या सर्व जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्दता ६४ ते ६५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३७ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. या आठवड्यात पावसाची शक्यता नाही.
पूर्व विदर्भ
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. मात्र पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३६ टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १४ किमी राहील. कमाल तापमान सांगली व सातारा जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. तर कोल्हापूर, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस. किमान तापमान सातारा जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३०टक्के राहील.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
कृषी सल्ला
बागायत रब्बी ज्वारी व हरभरा पिकांच्या पेरण्या करावी.
खरीप हंगामातील सोयाबीन, भात, भुईमूग पिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करावी. मळणी करून धान्य सुरक्षित स्थळी ठेवून द्यावे.
फळबागांमध्ये आच्छादन करावे. आवश्यकतेनुसार सिंचनाचा कालावधी वाढवावा.
रांगडा कांदा लागवड ऑक्टोबर अखेरपूर्वी पूर्ण करावी.
कुक्कुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत. पिण्यासाठी स्वच्छ आणि ताजे थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.