Summer Heat Agrowon
हवामान

Heat Wave : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण रात्रीचा इशारा

Summer Heat : सुर्य तळपत असतानाच राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : सुर्य तळपत असतानाच राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. नगर जिल्ह्यातील जेऊर येथे देशातील उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण रात्रीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात दिवसा उन्हाच्या झळा असह्य होऊ असतानाच रात्री देखील उष्ण ठरत आहेत. सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक आहे. यातच सकाळपासूनच असलेल्या ढगाळ हवामानासह सांयकाळी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. रात्रीच्या वेळी उकाड्यातील वाढ कायम आहे.

रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर जिल्ह्यातील जेऊर येथे देशातील उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे आहे.

आज (ता. १) मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, नांदेड जिल्ह्यात उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट), देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्यापासून (ता. २) विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.८, जळगाव ३९.८, जेऊर ४२.५, कोल्हापूर ३७.७, महाबळेश्वर ३१.१, मालेगाव ३९.६, नाशिक ३७.०, सांगली ३८.७, सातारा ३८.६, सोलापूर ४१.६, सांताक्रूझ ३२.७, डहाणू ३३.७, रत्नागिरी ३२.६,

छत्रपती संभाजीनगर ३९.५, बीड ४०.३, नांदेड ४०.४, धाराशिव ४०.३, परभणी ४०.८, अकोला ४०.७, अमरावती ३८.६, बुलढाणा ३८.६, ब्रह्मपूरी ४१.०, चंद्रपूर ३९.८, गडचिरोली ३८.४, गोंदिया ३८.२, नागपूर ३९.२, वर्धा ४०.०, वाशीम ४१.४, यवतमाळ ४०.५.

- उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) :

सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड.

४१ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

जेऊर ४२.५, सोलापूर ४१.६, वाशीम ४१.४, ब्रह्मपूरी ४१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT