Weather Update : उष्ण लाट, वादळी पावसाचा इशारा कायम

Summer Heat : सुर्य आग ओकत असल्याने राज्यात उन्हाची ताप चांगलीच वाढली आहे. दिवसा उन्हाच्या झळा असह्य होऊ असतानाच रात्री देखील उष्ण ठरत आहेत.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : सुर्य आग ओकत असल्याने राज्यात उन्हाची ताप चांगलीच वाढली आहे. दिवसा उन्हाच्या झळा असह्य होऊ असतानाच रात्री देखील उष्ण ठरत आहेत. अकोला येथे देशातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ३१) विदर्भात उष्ण लाट, राज्यात अनेक ठिकाणी उष्ण रात्र, तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कमाल तापमान चाळीशी पार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. तर कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार असताना, रात्रीच्या किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्ण लाट समजली जाते. सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून, विदर्भसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्ण रात्रींची स्थिती कायम आहे.\

Weather Update
Weather Update : दिवसा चटका, रात्रही ठरतेय उष्ण

शनिवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे आहे. आज (ता. ३१) विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. राज्यात अनेक ठिकाणी उष्ण रात्र, तर विदर्भात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Weather Update
Heat Wave : विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

शनिवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.१, धुळे ३२.५, जळगाव ३७.०, कोल्हापूर ३७.८, महाबळेश्वर ३१.६, मालेगाव ४०.२, नाशिक ३७.४, निफाड ३६.०, सांगली ३८.८, सातारा ३८.७, सोलापूर ४१.०, सांताक्रूझ ३२.५, डहाणू ३१.८, रत्नागिरी ३१.३,

छत्रपती संभाजीनगर ३८.२, बीड ४१.१, नांदेड ३९.९, धाराशिव ३९.९, परभणी ४१.६, अकोला ४२.६, अमरावती ४१.८, बुलढाणा ३८.०, ब्रह्मपूरी ४१.२, चंद्रपूर ४१.६, गडचिरोली ३९.२, गोंदिया ४०.२, नागपूर ४१.०, वर्धा ४२.१, वाशीम ४१.६, यवतमाळ ४१.२.

विदर्भात वादळी पावसाचा इशारा

छत्तीसगड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून विदर्भ, अंतर्गत कर्नाटक, ते अंतर्गत तामिळनाडू पर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. आज (ता. १) विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

- उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

अकोला, अमरावती, यवतमाळ.

- उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) :

सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशीव, चंद्रपूर, नागपूर, वर्धा,

- वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ.

४१ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४२.६, वर्धा ४२.१, अमरावती ४१.८, परभणी ४१.६, चंद्रपूर ४१.६, वाशीम ४१.६, ब्रह्मपूरी ४१.२, यवतमाळ ४१.२, बीड ४१.१, सोलापूर ४१, नागपूर ४१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com