Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला आहे. आज (ता. २६) पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे राज्यातील उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात घट होत असली तरी उन्हाचा उकाडा कायम आहे. दुपारनंतर जोरदार वादळी वारे, विजांसह वळीव पावसाला सुरुवात होत असून, सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढत आहे.

आज (ता. २६) राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, कोकणातील पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, पुणे जिल्ह्यात जोरदार पावसामुळे दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सून परतीची वाटचाल ‘जैसे-थे’

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (ता. २३) सोमवारी (ता. २३) परतीचा प्रवास सुरू केला. मंगळवारी (ता. २४) राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियानाच्या काही भागांतून मॉन्सून परतला आहे. फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माउंट आबू, दीसा, सुरेंद्रनगर ते जुनागडपर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा बुधवारी (ता. २५) कायम होती. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. उत्तर कोकणापासून बांगलादेशातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.  

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : पालघर, नाशिक.

अतिजोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : ठाणे, मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नगर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT